‘अग्गबाई सूनबाई’ मधील अनुरागची खऱ्या आयुष्यातली लव्ह-स्टोरी आहे खूपच मजेशीर, पत्नी आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री!

“अग्गबाई सूनबाई” या बहुचर्चित मालिकेमधून घराघरात पोचलेला अनुराग अर्थातच चिन्मय उदगीरकर हा नेहमीच त्याच्या लूक्समुळे आणि कामामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आलाय. याआधीसुद्धा घाडगे अँड सून किंवा नांदा सौख्यभरे या मालिकांमधून चिन्मयने उत्तम भूमिका साकारून आपल्या चाहत्यांना खूश केले होते.

अग्गबाई सूनबाई ही मालिका तिच्या शिर्षकगीतामुळे आणि अशोक सराफ यांच्या पत्नी निविदिता सराफ यांच्या उपस्थितीमुळे सतत प्रेक्षकांच्या ओठावर असते. या ना त्या कारणाने सतत या मालिकेची चर्चा चाहत्यांमधे होताना दिसून येते. अशा मालिकेत सध्या गिरीश ओक आणि अद्वैत दादरकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत चिन्मय अभिनय करताना दिसतोय.

महत्त्वाची बाब म्हणजे चिन्मचा महिला चाहतावर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यांना नेहमीच चिन्मयचे रिलेशनशिप स्टेटस जाणून घ्यायचे असते. त्यांना हे सांगावेसे वाटते की चिन्मयचे लग्न नुकतेच गिरिजा जोशी हिच्यासोबत झाले आहे. चिन्मयने लव्ह मॅरेज केले आहे.

Third party image reference

सध्या तो “शेजारी शेजारी सख्खे शेजारी” या मालिकेचं सुत्रसंचालनही करताना दिसून येतो. चिन्मयचा सिनेसृष्टीतील हा प्रवास असाच सुरू राहिल यात तीळमात्रही शंका नाही. पण आज आपण जाणून घेणार आहोत चिन्मयच्या लव्ह स्टोरी विषयी. चिन्मय हा कॉलेज मधे असल्यापासून अनेक एकांकीका आणि स्पर्धांमधे झळकायचा.

त्यामुळेच अर्थातच त्याच्यावर तेंव्हापासूनच अनेक मुली फिदा होत्या. याच दरम्यान त्याची ओळख कुठल्यातरी कलाविषयक कामानिमित्त गिरीजा जोशी हीच्याशी झाली. दोघेही कलाकार असल्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी सहज जुळून आल्या.

Third party image reference

ओळखीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. दोघांनी अनेक चित्रपटांमधे एकत्र कामही केले. त्यांचे नाते अधिकाधिक घट्ट होत गेले आणि त्यांनी एकमेकांसोबत जन्मगाठ बांधली. गिरीजा जोशी ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नावारूपाला आली.

चिन्मय हा नेहमीच कथेनुसार आपल्या अभिनयात बदल करून अप्रतिमरित्या पात्र साकारतो. चिन्मयचा आवाज आणि त्याचा पडद्यावरील सहज वावर ही त्याच्या अभिनयाची वैशिष्ट्ये म्हणता येतील. चिन्मयने फक्त मालिकाच नाही तर चित्रपटांमधेही अनेक मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

सध्याच रिलिज झालेल्या मेक अप या चित्रपटातही चिन्मयने सुंदर भूमिका साकारली आहे. चिन्मय सारख्याच अनेक मराठी नामवंत कलाकारांच्या आयुष्यातल्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवत राहू. फक्त तुम्ही आमच्या लेखांना जास्तीत जास्त आपल्या मित्रांमधे शेअर करा.