मराठमोळ्या अभिनेत्री कडून पूरग्रस्तांना १० कोटींची मदत! दीपाली सय्यदच्या वागण्याने बॉलिवूडला चपराक..

पाऊस सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो. मात्र त्यानं मर्यादा ओलांडली की त्याच्यापासून सुटका कधी होते याची लोक वाट पहात राहतात. यंदाही काहीसं असंच झालं आहे. ऐन पावसाळ्यात पावसाने आधी दडी मारली होती. त्यानंतर मात्र तो इतका बरसला की लोकांच्या संसाराची बसलेली घडी त्याने विस्कटून टाकली. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात महापुराने थैमान घातले आहे.

कोकणात चिपळूण, महाड तर इकडे कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासारखे जिल्हे पाण्याखाली गेले. पावसाच्या संततधारेनं अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणलं. लोकांचे संसार वाहून गेले. कित्येकांनी आपले जीव गमावले. अनेक व्यवसायांचे नुकसान झाले. या पावसाने आणि पुराने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. दोन वर्षांपूर्वीही पुराने हीच स्थिती ओढवली होती.

पावसाचा जोर कमी झाला; पुढाऱ्यांच्या दौऱ्यांचा आणि आश्वासनांचा ओघ वाढला. नेत्यांनी लोकांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर केली, मात्र मदत अजून लोकांपर्यंत पोचली नाहीये. अशा परिस्थितीत पुढे आली आहे मराठी अभिनेत्री दीपाली सय्यद. शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या दीपाली सय्यद ने कोल्हापूर जिल्ह्यातील भोकरदन गावाला भेट दिली आणि तिथली पूरपरिस्थिती पाहून तिचं मन हेलावून गेलं.

या संवेदनशीलतेतून तिने या गावासाठी १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने तातडीची मदत म्हणून व्यापाऱ्यांना १० हजार आणि सामान खरेदीसाठी ५ हजार अशी एकूण १५ हजारांची मदत जाहीर केली आहे. मात्र ही मदत अजून लोकांपर्यंत पोचली नाहीये. आधीच दोन वर्षं को’रोना महामारीने जनता बेजार झाली आहे. त्यात आलेल्या या पुराने लोकांचे कंबरडे मोडून गेले आहे.

“भयंकर आहे सगळं. जेव्हा प्रत्येकाशी मी बोलत होते तेव्हा अंगावर काटा येत होता. लोक धाय मोकलून रडत आहेत. छत नाही, संसार उघडे पडले आहेत. घराघरात एकच चित्र आहे. दोन वर्षांपूर्वीही असंच झालं होतं. कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, चिपळूण अशा भागांत मोठं नुकसान झालं आहे. मी हे चित्र डोळ्यानं बघितलं आहे. काहीच उरलं नाहीये.” दीपाली सांगत होती.

“दोन वर्षं को’रोना महामारीत गेली. कामधंदा बंद आहे. त्यात निसर्गाचा प्रकोप. गावंच्या गावं उध्वस्त झाली आहेत. काही उरलं नाही. हे बघताना भयंकर वाटलं. देव किती परीक्षा घेणार? स्ट्रॉंग आहे म्हणून अजून किती परीक्षा द्यायच्या? को’रोना येतोय, पूर येतोय.” अशा शब्दांत दीपालीने आपल्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे बॉलिवूड मधील कलाकारांवर टीका होत असताना दुसरीकडे दीपालीने केलेले हे कृत्य म्हणजे बॉलिवूडला बसलेली चपराक आहे.