‘जुळून येती रेशीमगाठी’ मधील नानाच्या वास्तविक जीवनातील दोन्ही पत्नी पहा..

प्रसिद्ध मराठी मालिका ‘अग्गबाई सासुबाई’ ला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. या मालिकेत शेफ अभिजीत राजेची भूमिका साकारणारे अभिनेते गिरीश ओक यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल तुम्हाला माहित नसणाऱ्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे. ‘अग्गबाई सासुबाई’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमधून प्रसिद्ध झालेले अभिनेते, कवी, लेखक डॉ.गिरीश ओक यांचे अनेक चाहते आहेत. त्यांच्या वयक्तिकआयुष्याबद्दल काही फार कमी लोकांना ठाऊक आहे. ‘अग्गबाई सासुबाई’ या मालिकेत गिरीश ओक शेफ अभिजीत राजेच्या भूमिकेत आहेत. त्यांची हि भूमिका प्रेक्षक वर्गला खूप आवडली.

गिरीश ओक यांची वास्तविक खऱ्या जीवनामध्ये दोन वेळा लग्न झाले आहे. ते मूळचे नागपूरचे असून त्यांनी आयुर्वेद वैद्यकीय कॉलेज मधून डॉक्टरकीची पदवी घेतलेली आहे. या मध्ये काही वर्ष काम केल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राकडे येणायचे पसंद केले. नाटक मालिका मधून त्यांनी आपल्या अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी प्रथम पद्मश्री पाठक यांच्यासोबत लग्न केले.

या नंतर त्यांना गिरीजा नावाची मुलगी झाली. पण नंतर काही कारणामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मुलगी गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतल प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नंतर गिरीश यांनी २००८ साली दुसरे लग्न पल्लवी यांच्या सोबत केले.

त्यांची दूरदर्शन वरील ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेने त्यांना खरी ओळख करून दिली. या नंतर त्यांनी ‘पसंत आहे मुलगी’, ‘आराधना’, ‘पिंजरा’, ‘अग्निहोत्र’, ‘या सुखांनो या’, ‘अधुरी एक कहाणी’, ‘अवंतिका’, ‘निवडुंग’, ‘दामिनी’ इ. मालिकेमध्ये काम केले.

मालिकेमध्ये काम करताना अनेक वेळी त्यांनी वडिलांची भूमिका साकारली आहे. काही प्रेक्षक त्यांना ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील नाना म्हणून ओळखतात. सध्या ‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेत साकारत असलेल्या शेफ अभिजितलादेखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.