मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या कुटूंबासोबत राहतात या आलिशान बंगल्यामध्ये, बंगल्याची किंमत जाणून पाया खालची जमीन निसटेल..

अफाट संपत्ती आणि पैसा आल्यावर आपण आपली सर्व स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो, पण स्वप्न पण त्यानेच बाळगावेत ज्याचे क’ष्ट खूप आहेत आज आम्ही कष्टाच्या बाजूने बोलतोय हे तुम्हाला जाणवलं असेल हे नक्की तर आम्ही सांगतोय क्रिकेट मधील राजामाणुस सचिन तेंडुलकर ह्यांच्याबाबत.

क्रिकेटचा देवमाणूस म्हणून ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचे दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी २४ एप्रिल रोजी आपला ४८ वा वाढदिवस साजरा केला आणि या खास प्रसंगी सचिन तेंडुलकरला त्याच्या सर्व प्रियजनांकडून अनेक अभिनंदन व शुभेच्छा मिळाल्या आहेत आणि सचिनला तर एक व्हिडिओ सामायिक बनवून त्यात आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानले असून सचिनचा हा व्हिडिओ जोरदार व्हा’यरल होत आहे.

‘मास्टर ब्लास्टर’ म्हणून ओळख मिळणारा सचिन तेंडुलकरची क्रीडा जगातील कारकीर्द जेवढी खरी आहे त्याहून जास्त तो आपल्या वास्तविक आयुष्यात जितके मास्टर आहे आणि आज सचिन आपल्या कुटुंबासोबत खूप आनंदात आयुष्य घालवत आहे..

तर ह्या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर यांच्या राहत्या घराची काही फोटोज वैगेरे जे असेल ते सर्वकाही देणार आहोत.. ज्यामुळे तुम्हाला हे लक्ष्यात येईल की क्रिकेट मधील मास्टर खऱ्या आयुष्यात केवढा श्रीमंत आहे.

सर्वाना माहीत असेलच की सचिन मुंबईतल्या आपल्या भव्य मेन्शनमध्ये आपल्या कुटुंबासमवेत राहत असतो, आज आम्ही पश्चिम वांद्रेच्या पॅरी क्रॉस रोडवर सचिन तेंडुलकरच्या भव्य बंगल्याला भेट देणार आहोत, तर या बंगल्याची काढलेल्या पत्रकारांनच्या फोटोनुसार आम्ही येथे दाखवत आहोत.

तुम्हाला माहिती असेल की सचिन तेंडुलकरने २००७ साली हे विकत घेतले होते आणि ह्या शानदार बंगल्याची किंमत सुमारे ३९ कोटी रुपये एवढी आहे आणि सचिन तेंडुलकरचे हे घर संपूर्ण ६००० चौरस फूट भागात पसरलेले आहे, आणि या घरात सचिन तेंडुलकर २०११ पासून वास्तव्यास आहे.

सचिन तेंडुलकरच्या या भव्य बंगल्यात अनेक मजले त्याचबरोबर टेरेस व दोन तळघर असून सचिन तेंडुलकरच्या घराचे प्रवेशद्वार खूपच भव्य दिसते आहे आणि त्याचबरोबर घराची सुंदरता घरात असलेल्या बागेमुळे अजून खुलून दिसते हे नक्की. तर तुम्हाला कसा वाटला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा हा आलिशान बंगला कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.