‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेत सुजित ढाले पाटलांची भूमिका साकारणारा हा अभिनेता खऱ्या जीवनात आहे असा..करतो अशी देखील कामे?

दररोज टेलिव्हिजनमधून आपल्या भेटीला येणाऱ्या तारकांच्या खऱ्या आयुष्यात नेमके काय घडत असेल? त्यांचं रुटीन कसं असेल? त्यांचे नातेवाईक कोण? त्यांचा नेमका प्रवास कसा घडला? याबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. पण सोशल मिडीया मुळे या गोष्टी चाहत्यांपर्यंत सहज पोहचत आहेत.

नुकतीच प्रचंड टिआरपी कमावत असलेली “राजा राणीची गं जोडी” ही मालिका चाहत्यांना वेड लावत आहे. पात्रांच्या बोलीभाषेमुळे ही मालिका प्रेक्षकांना जवळची वाटत आहे. त्यातील अनेक पात्रांविषयी लोक विचारत आहेत. त्यांना सोशल मिडीयावर फॉलो करत आहेत.

सदरील मालिकेत सुजित ढाले पाटील ही भूमिका साकार करणाऱ्या अभिनेत्याची मात्र बातच निराळी आहे. त्याचे खऱ्या आयुष्यातील नाव पार्थ घाटगे असे आहे. पार्थ घाटगे हा प्रसिद्ध निर्माते अण्णासाहेब घाटगे यांचा नातू आहे. पार्थ घाटगे हा अत्यंत गुणी आणि उत्तम अभिनेता आहेच पण तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की तो खऱ्या आयुष्यात एक उमदा लेखक आणि उत्कृष्ट दिग्दर्शकसुद्धा आहे.

बऱ्याचदा कलाकारांना त्यांच्या नेमक्या गुणवैशिष्ट्याचे आकलन होण्यासाठी अनेक प्रकारच्या कामांमधून स्वतःला तपासून पाहावे लागते. यात पार्थ घाटगे सारखे बहुआयामी व्यक्तीमत्व इंडस्ट्रीला मिळतात. तो मूळचा सांगलीचा आहे. त्याला नाटकाची खूप आवड होती. म्हणजे अजूनही आहे.

त्याने त्याच्या कॉलेजवयात काही नाटकं आणि एकांकिका केलेल्या आहेत आणि अजूनही करतो आहे. पार्थ घाटगे याने या मालिकेअगोदर जाडूबाई जोरात, गणपती बाप्पा मोरया, श्रावणबाळ रॉकस्टार, ड्राय डे, लग्न मुबारक अशा मालिका तसेच चित्रपटातून महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सबकाँशिअस आणि एक सेल्फी आभाळाचा या लघुपटांचे दिग्दर्शन आणि लेखन पार्थने केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Parth Nishant Ghatge (@parthghatge2897)

पार्थची ही गोष्ट अत्यंत कौतुकास्पद आहे. अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या संबळ या चित्रपटात त्याने प्रमुख नायकाची भूमिका साकारली होती.

आगामी कलर्स मराठी अवॉर्ड मध्ये लोकप्रिय भावंडं आणि लोकप्रिय मुख्य भूमिका अशी दोन नामाकनं पार्थ घाटगे याला मिळाली आहेत. त्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच गुणी अभिनेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेण्यासाठी नक्की आमच्या या लेखाला शेअर जास्तीत जास्त करा.