लग्नानंतर हे ३ काम करण्यास रणवीर सिंग वरती दीपिकाने घातली बंदी..जाणून चकित व्हाल

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोन यांनी इटलीमध्ये लेक कोमो इथे १४-१५ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्न केले. रणवीर सिंगसाठी या ३ गोष्टी करण्यास दीपिका पादुकोणने बंदी घातली आहे. रणवीरने स्वत: ला मिलेनियम हसबैंडचा टॅग दिला आहे.

बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या ड्रीम वेडिंगवर फक्त चाहतेच बॉलिवूड सेलेब्सदेखील डोळे लावून होते. लग्नानंतर रणवीरने स्वत: ला मिलेनियम हसबैंडचा टॅगही दिला आहे. एका मुलाखतीत रणवीरने सांगितले की लग्नानंतर दीपिकाने त्याच्यासाठी ३ गोष्टींवर बंदी घातली आहे.

रणवीरने खुलासा केला की, “दीपिकाने रात्री उशिरापर्यंत मला घराबाहेर थांबण्यास बंदी घातली आहे. जेवण न करता घरातून जाणे आणि कॉल न उचलणे याला पूर्णपणे मनाई आहे. ”दोघेही गेल्या ६ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर दीपिकाला पत्नी म्हणून पाहून रणवीरला कसे वाटते?

हे विचारल्यावर रणवीर म्हणाला की, “माझ्या बायकोला कोणाची नजर ना लागो” . ती अत्यंत सुंदर आहे. जेव्हा ती झोपायला जाते तेव्हा सुंदर दिसते. जेव्हा उठते तेव्हा ती खूपच सुंदर दिसते. दिवसभर सुद्धा खूपच सुंदर दिसते. दररोज जेव्हा मी उठतो आणि ती माझ्या जवळ असते, तेव्हा माझा त्यावर विश्वास बसत नाही. ६ वर्षे झाली आहेत परंतु अद्याप मला विश्वास बसत नाही की, ही एक चांगली भावना आहे.

रणवीरने सांगितले की दीपिका घरात ग्लॅमरस दिवा म्हणून राहत नाही. रणवीर म्हणाला, “दीपिका खूप घरगुती आहे, मला खूप आवडते. त्याचबरोबर ती एक चांगली गृहिणी देखील आहे. तिला घरघर खेळायला खूप आवडते. ती माझं आयुष्य खूप सुंदर बनवणार आहे. ’’ वर्कफ्रंटबद्दल बोलताना रणवीर सिंगचा सिंबा गेल्या वर्षी २८ डिसेंबरला प्रदर्शित झाला होता. जो अजूनही प्रचंड पैसे कमवत आहे. त्याचा पुढचा चित्रपट गली बॉय १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदाच रणवीर आणि आलिया भट्ट एकत्र दिसणार आहेत.

दुसरीकडे लग्नानंतर दीपिका पादुकोण मेघना गुलजारच्या छपाक या चित्रपटात दिसणार आहे. अ‍ॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या लक्ष्मी पंडित यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारित आहे. मिर्झापूर फेम अभिनेता विक्रांत मस्सी दीपिका सोबत दिसणार आहे.