१५ वर्षीय अभिनेत्री रेखाला २५ वर्षाच्या अभिनेत्याने केले होते जबरदस्ती किस, देश-विदेशमध्ये झाली होती चर्चा…

बॉलीवूड इंडस्ट्रीत चित्रपट करत असताना कोणत्या सीनला अचानक सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही त्यामुळे कलाकाराला सुरुवातीपासूनच स्वताला तयार करून ठेवावे लागते मग ती अभिनेत्री असू दे किंवा अभिनेता स्वतःच्या साच्याच्या बाहेर जाऊन खूप सार्‍या गोष्टी कराव्या लागतात त्यापैकी आज आम्ही बोलणार आहोत एका सुप्रसिद्ध अभिनेत्री बद्दल जिच्या सोबत अश्या काही गोष्टी घडल्या आहेत. त्या आम्ही सांगणार आहोत.. चला तर मग सुरवात करूया…!

अभिनेत्री रेखा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जिचे आजही करोडो चाहते आहेत. रेखाच्या सौंदर्याची जगभरात चर्चा होती. पण त्यांच्या नात्यालाही वादांनी घेरले होते. रेखा तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रकाशझोतात आली. रेखाचा पहिला चित्रपट अंजना सफर होता, जो १९६९ मध्ये शूट झाला होता. पण काही कारणास्तव हा चित्रपट १० वर्षांनी दो शिकारी नावाने प्रदर्शित झाला.

या चित्रपटातील एका दृश्यामुळे रेखा रातोरात प्रसिद्ध झाली. वास्तविक, रेखा आणि विश्वजीतच्या किसिंग सीनवरून चित्रपटात गदारोळ झाला होता. त्यावेळी रेखा १५ वर्षांची होती आणि तिने इतक्या लहान वयात २५ वर्षांच्या नायकाला किस केले होते. सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातून हे दृश्य हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

न्यायालयाने खोसला समिती स्थापन केली. तपासानंतर समितीने सांगितले की, कोणता सीन हा दोघांचा वैयक्तिक मामला आहे. दोघांचाही आक्षेप नसेल तर तिसर्‍याचाही आक्षेप नसावा. प्रकरण खूप वाढले होते. अमेरिकेच्या लाईफ मॅगझिनच्या कव्हर पेजवरही या प्रकरणाची बातमी प्रसिद्ध झाली होती. कथेचे शीर्षक होते द किसिंग क्रायसिस ऑफ इंडिया.

या सीनसाठी रेखा आणि विश्वजीतचा फोटो हवा होता, त्यासाठी त्यांना बोलावण्यात आले आणि हा किसिंग सीन पुन्हा शूट करण्यात आला. रिपोर्ट्सनुसार, रेखाला न सांगता हा सीन शूट करण्यात आला होता. विश्वजीत ५ मिनिटे रेखाचे चुंबन घेत राहिला आणि कोणीही काहीही बोलले नाही. दिग्दर्शक राजा नवाथे यांनीही कट नाही म्हटलं आणि सीन सुरूच ठेवला.

रेखाच्या चरित्रावर लिहिलेल्या रेखा द अनटोल्ड स्टोरी या पुस्तकात किसिंग सीनचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय रेखा अमिताभ बच्चनसोबतच्या अफेअरमुळेही चर्चेत होती. आजही जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा एकत्र दिसतात तेव्हा मीडियामध्ये हेडलाईन्स होतात. त्यामुळे अभिनेत्रींना बॉलिवूड इंडस्ट्रीत सीन द्वारे खूप सार्‍या गोष्टींना सामोरे जावे लागते हे आपण आता पाहिलेच असेल तर तुम्हाला या बद्दल काय वाटतं मला कमेंट मध्ये जरूर कळवा धन्यवाद.