CID मालिका संपल्यानंतर मालिकेतील कलाकार आता जगत आहेत असे आयुष्य..पहा दया करतोय हे काम..

छोट्या पडद्यावरील ‘सीआयडी’ (CID) ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती मालिका होती. छोट्या पडद्यावरील काही मोजक्या मालिका अशा आहेत ज्या अनेक वर्षं सुरू असून देखील प्रेक्षकांचे या मालिकांवरचे प्रेम जराही कमी झालेले नाही. त्यातलीच ‘सीआयडी’ ही एक मालिका. हा शो १९९८ मध्ये सुरू झाला होता. २७ ऑक्टोबर २०१८ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात आला. मालिका संपल्यानंतर यातील कलाकार आता काय करतात असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चला, तर पाहूया या कलाकारांविषयी काही…

शिवाजी साटम: शो मध्ये एसीपी प्रद्युम्न यांची भूमिका साकारणारे अभिनेते शिवाजी साटम यांचे वय ७१ वर्षे आहे. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ४० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप सोडली आहे.

दयानंद शेट्टी: ‘दया, दरवाजा तोड दो’ या संवादातील ताकदवान इन्स्पेक्टर दया म्हणजे अभिनेता दयानंद शेट्टी. त्यांनी अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अलीकडेच त्यांनी ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटात काम केले होते. दयानंद शेट्टी यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली असून त्यांना एक मुलगी देखील आहे.

आदित्य श्रीवास्तव: अभिनेते आदित्य श्रीवास्तव यांनी या शो मध्ये इन्स्पेक्टर अभिजीतची भूमिका साकारली होती. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यांचे लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचं नाव मानसी श्रीवास्तव आहे. त्यांना तीन मुले आहेत.

दिनेश फडणीस: शो मधील गमतीदार पात्र म्हणजे फ्रेडरिक उर्फ फ्रेडी. ही भूमिका साकारली होती अभिनेता दिनेश फडणीस यांनी. त्याने देखील अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दिनेश विवाहित असून त्यांना एक लहान मुलगी आहे.

श्रद्धा मुसाळे: या शो मध्ये डॉ. तारिका साकारणारी अभिनेत्री आहे श्रद्धा मुसाळे. सीआयडी व्यतिरिक्त तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

ऋषिकेश पांडे:शो मधील साहसी इन्स्पेक्टर सचिनची भूमिका साकारली होती अभिनेता ऋषिकेश पांडे याने. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तो सध्या ४६ वर्षांचा असून विवाहित आहे. तसेच त्याला एक मुलगाही आहे.

जान्हवी छेडा: शो मधील इन्स्पेक्टर श्रेया साकारली होती अभिनेत्री जान्हवी छेडाने. तिच्या या भूमिकेने तिला प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर तिने लग्न केले आणि आता तिला एक मुलगी देखील आहे.