कुत्र्याच्या पिल्लासोबत नवजात जन्मलेल्या बाळाला सोडून गेली निर्दयी आई, न बोलणाऱ्या जनावरांनी केले रात्रभर बाळाचे रक्षण…

माणसात कुणीच कुणाचं नसतं म्हणून तर मुक्या जनावराला जपायचं असतं सगळे बेमान करतील पण आपल मूक जनावर कधी आपला इमान सोडत नाही बर का..! माणसं कधी कधी इतकी निर्दयी होतात की पोटच्या गोळ्याला सुद्धा विकून टाकतात. असाच एक प्रसंग मुंगेली जिल्ह्यातील लोरमी लगत सरिसताल गावात झाला आहे. ही घटना ऐकून खरंच तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. एका निर्दयी आईने आपल्या मुलाला जन्मताच कुत्र्यांच्या पिलांमध्ये फेकून तेथून निघून गेली. त्या मुलाच्या शरीरावर एक सुद्धा वस्त्र नव्हते. ते लहान बाळ रात्रभर बिना कपड्याचे त्या कुत्र्यांच्या पिलांमध्ये पडून होते.

सकाळ होताच त्या गावातील एका शेतकऱ्याने हा प्रसंग पाहिला त्याने पटकन जवळ असलेल्या पोलीस प्रशासनास कळवले. यानंतर मुलाला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. यानंतर बाळावर उपचार सुरु करण्यात आले. त्या मुलाला सध्या बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. बालकल्याण समितीने या बाळाचे नाव आकांक्षा असे ठेवले आहे. मुल संपूर्ण पद्धतीने सुरक्षित आहे. पोलीस गर्भवती होऊन मुलाला जन्म देणाऱ्या त्या आईला शोधताहेत. सारिसताल मधील शेतकरी भैयालाल यांच्या शेतात नवीन जन्मलेले मुल कुत्र्यांच्या पिल्लासोबत आढळून आले.

हे बाळ संपूर्ण पद्धतीने स्वस्थ आहे. या बाळावरुन निर्दयी आईबद्दल सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. अशी कोणती आई आपल्या मुलाला कडकडत्या थंडीत कुत्र्यांच्या पिल्लानबरोबर झोपऊन जाईल..? पण देवाचे धन्यवाद मानले पाहिजे! रात्रभर कुत्र्यांच्या पिल्लांना सोबत असून सुद्धा बाळाला काडीमात्र नुकसान झाले नाही.

कधी कधी देवरूपी अवतार सुद्धा कोणाची कोणत्या काळात मदत करेल हे सांगता येत नाही. रात्रभर त्या कुत्र्यांच्या पिल्लांचा सोबत असून सुद्धा तिथे काहीच प्रसंग घडला नाही ही खूपच मोठी बाब आहे. याबद्दल देवाचे खूप खूप धन्यवाद. जगाच्या पाठीवर अशी कोणतीच निर्दय आई नाही आहे जी असा प्रसंग पुन्हापुन्हा घडवेल. ते म्हणतात ना आई माझा गुरु आई कल्पतरु! आई शिवाय हे जग नरक आहे.

पण आईच अशी वागली तर मग काय करावं..? याचा प्रश्न खूप जणांना आत्तासुद्धा पडलेला आहे. पोलीस घटनेबद्दल बारकाईने शोध घेत आहे. लवकरच तिच्या आईचा ठावठिकाणा लागो. आणि तिने केलेल्या कृत्याबद्दल तिचा जवाब कळो.