मुलगी जन्माला अली म्हणून आई वडिलांनी एका किन्नराला दिली. त्याने मुलीसोबत जे काही केलं ते वाचून विश्वास नाही बसणार..

घरात लहान मूल येणं म्हणजे आपल्याकडे देवाचा प्रसाद समजला जातो. त्यात तर मुलगी जन्मली म्हणजे धनसंपदा आली अशी समजूत आहे. “पहिली भेटी धनाची पेटी” अशी म्हण ही प्रचलित आहे. मुलीला कुमारी रुपात पूजण्याचीही प्रथा आपल्याकडे आहे. ही झाली चांगली बाजू पण दुसरी बाजू खूप वाईट आहे. आपल्याकडे जन्माआधीच पोटातच स्त्री भ्रूण मारण्याची कुप्रथा आपल्याला दिसते. कायद्यानं हा गुन्हा असला तरीही हे गैरकाम लपून छपून चालू असतं.

आणि हा प्रकार करायचा नसेल तर जन्मल्यानंतर मुलीला सोडून दिलं जातं. या लहान जीवाला कसल्या वाईट परिस्थितीतून जावं लागतं…अशाच एका मुलीची गोष्ट जाणून घेऊयात,

या मुलीला तिच्या आई वडिलांनी जन्मानंतर एका तृतीयपंथियाच्या हाती सोपवलं. एका अनोळखी व्यक्ती कडे आपल्या पोटचा गोळा देताना त्यांना काहीच वाटलं नाही का? त्यांना जरा सुद्धा मायेचा पाझर फुटला नाही. आज या घटनेला २३ वर्षे झाली. ज्या मुलीवर ही वेळ आली तिचं नाव ज्योती. आणि या ज्योतीला डिंपल बाबांकडे देण्यात आलं होतं, ते तिथल्या पंचक्रोशीत मोठं प्रस्थ होतं.

याच डिंपल बाबांनीच ज्योतीला सांभाळलं, तिला लहानाचं मोठं केलं. तिला योग्य ते शिक्षण दिलं. तिचं नीट संगोपन केलं. तिला आई – वडिलांची माया दिली. ज्योती उपवर झाल्यावर तिचं लग्नही अमृतसर मध्ये लावून दिलं.

हे डिंपल बाबा एक किन्नर आहेत. त्यांच्यामुळे ज्योतीला आई आणि वडील दोघांचंही प्रेम लाभलं. तिला बाबांनी पहिल्यांदा पाहिलं होतं, तेंव्हा तिचं वय होतं १ दिवस. पण बाबांनी तिला आपलंसं केलं. आपल्या आयुष्यात आलेल्या या नवीन गोड जबाबदारीचं बाबांनी फार छान स्वागत केलं. त्या छोट्या बाळाला मधाचं बोट चाटवलं. ज्या प्रमाणे आई अंगाई गाते, तशीच अंगाई गाऊन तिला झोपवलं.

बाबांनी त्या वेळच्या आठवणी सांगताना म्हटलं की तिच्या आई वडिलांना आधीच चार मुले व मुली आहेत. आणि त्यात ही मुलगी तर त्यांनी अशीच वाऱ्यावर सोडून दिली असती. पण ज्योती बाबांकडे आल्यामुळे तिचं आयुष्य घडलं.

ज्योतीला पाठवणीच्या वेळी तिच्या आई वडिलांच्या बद्दल विचारलं तर ज्योती म्हणाली की ‘मी आज जी काही आहे, ती डिंपल बाबांमुळेच. आणि माझे पालक तर तेच आहेत.

वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी ज्योतीला शाळेत घातलं. तिला पदवीचं शिक्षण दिलं. नंतर ज्योतीने संगणक शास्त्रात डिप्लोमा केला. आणि ज्योतीने बाबांच्या आशीर्वादाने आता संसारालाही सुरुवात केली. ज्योतीच्या म्हणण्याप्रमाणे बाबांनी तिच्यासाठी जे केलं आहे. तेवढं कदाचित तिचे सख्खे आईवडीलही करू शकले नसते. म्हणून ती बाबांना जन्मदात्यांपेक्षा मोठं स्थान देते. डिंपल बाबांमुळेच दुसऱ्याच दिवशी तिला नवीन जन्म मिळाला.

ज्योतीसारख्या सुदैवी मुली फारच कमी असतात. म्हणूनच बेटी बचाव अभियानाची गरज पडते. नाही का!.!.!