“आई कुठे काय करते” मालिकेतील संजना उर्फ रुपाली भोसले चोरते सेटवरील या गोष्टी,स्वतःच केला खुलासा…!

मित्रहो अनेक मालिका सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात, खास करून यातील कलाकार मंडळी तर खूप लक्ष वेधून घेत असतात. अशीच एक स्टार प्रवाह वरील कमी वेळात जास्त गाजलेली मालिका “आई कुठे काय करते” पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील संजनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले हल्ली खूपच चर्चेत आली आहे. तिच्या बद्दल एक रंजक बातमी समोर आली असून ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. सर्व नेटकरी ही बातमी जाणून अगदी थक्क झाले आहेत.

रुपाली सेटवरून काही गोष्टी चोरत असल्याचे समोर आले आहे आणि हे तिने स्वतःच सर्वाना सांगितले आहे. एका मुलाखती मध्ये तिने स्वतःच याचा खुलासा केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे ऐकून सर्वजण कान तीक्ष्ण करत आहेत. “आई कुठे काय करते” मालिकेचे शूटिंग ‘समृद्धी’ बंगल्यात होत असते, तर या सेटबाहेर काही कलाकारांनी आणि स्पॉटबॉय दादांनी चक्क भाजीपाला लावला आहे.

सेटच्या बाहेर वांगी, भेंडी, गवती चहा, मेथी ,पालक, कांद्याची पात, लाल माठ यांसारख्या भाज्या लावल्या आहेत. मालिकेत आपण खूपदा अरुंधतीला किचनमध्ये भाज्या निवडताना पाहत असतो, मित्रहो जेव्हा ती या भाज्यांची टरफले काढते तेव्हा ती फेकून न देता बाहेरील मिनी शेतात ती पुन्हा लावली जातात. आतापर्यंत चवळीच्या शेंगा, गवती चहा यांसारखी झाडे देखील लावली आहेत. तसेच खूपशा नवनवीन पालेभाज्या लावल्या जातात.

तर या पालेभाज्या कधी कधी रुपाली घरी सुद्धा घेऊन जाते. त्यामुळे ती अरुंधतीच्या किचनमधील भाज्या चोरते व घेऊन जाते. हे तिने स्वतःच मान्य केले आहे. तिची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवाय तिची भूमिका सुद्धा या मालिकेतून खूप प्रसिद्ध झाली आहे. आजवर तिने अनेक मालिकेत काम केले आहे, हिंदी मराठी दोन्ही क्षेत्रातील मालिकेत तिने अनेक उत्तम भूमिका पार पाडल्या आहेत.

पण रुपालीला “आई कुठे काय करते” या मालिकेतून विशेष ओळख मिळाली आहे, शिवाय यातून तिला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता लाभली आहे. तिची ही लोकप्रियता अशीच टिकून राहो व दिवसेंदिवस त्यात वाढ होत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.