‘आई कुठे काय करते’ मालिकेतील विमल खऱ्या जीवनामध्ये आहे खूपच ग्लॅमरस आणि सुंदर, पहा फोटो..

स्टार प्रवाह या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ ही खूप कमी काळामध्ये प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील सर्वच पात्र कमालीची भूमिका बजावतात. मात्र, या मालिकेतील साधी भोळी दिसणारी ‘विमल’ खऱ्यखुऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर आहे.

विमलची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्री नाव सीमा घोगळे आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आईची भूमिका बजावणारी अरुंधतीच्या कामात मदत करण्यासाठी नेहमी विमल धावून येते. विमलच्या कोकणी भाषेतील संवादाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

विमलची भूमिका साकारणारी अभिनेत्री सीमा घोगळे ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती अभिनेत्री असून, एक उत्तम डान्सर देखील आहे. तिने मालिकेशिवाय नाटक आणि चित्रपटात देखील काम केले आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. तिच्या या फोटो आणि व्हिडिओला तिचे चाहते खूप पसंती देतात.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील आई, आप्पा, अनिरुद्ध, अरूंधती, अभिषेक, ईशा, यश या पात्रांबरोबरच संजना, शेखर, गौरी आणि विमल यांच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनावर राज करत आहेत. त्याचबरोबर मालिकेतील सर्वच पात्रांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Anant Ghogale (@seemaghogale)

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे ४०० एपिसोड पूर्ण झाले आहेत. चाहते देखील या मालिकेला भरभरून प्रेम व प्रतिसाद देत आहे. आता या मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आला आहे. अभिषेकला “तू माझ्याशी लग्न नाही केल, तर मी आ’त्म’ह’त्या करेन” अशी धमकी देवून आ’त्म’ह’त्येचा प्रयत्न केल्याचे खोटं बोलून त्याच्याशी अंकिताने लग्न केल आहे. ही गोष्ट सर्वांच्या समोर आली आहे. अंकिताचा हा खोटारडेपणा सर्वांना समजताच तिला घराबाहेर हाकलून देण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Seema Anant Ghogale (@seemaghogale)

दरम्यान, यानंतर मालिकेत आता नवीन ट्विस्ट येणार आहे. लवकरच अरूंधती आणि अनिरुद्ध यांचा घटस्फोट होणार आहे. दुसरीकडे संजना अरूंधती आणि अनिरुद्धच्या घट’स्फो’टा’मुळे खूप खूश आहे. सध्या ती लग्नाची तयारी करताना दिसते आहे. मालिकेमध्ये आलेल्या या नवीन ट्विस्टमुळे मालिका अधिक रंजक झाली आहे. आता पुढे काय होणार यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहे.