घ’ट’स्फो’टानंतर आमिर खान आणि किरण राव दिसले एकत्र! नेटकऱ्यांच्या आहेत या प्रतिक्रिया…

आमिर खान आणि किरण राव यांनी अचानक आपला घ’ट’स्फो’ट जाहीर केल्याने अनेकांना आश्चर्याचा ध’क्का बसला होता. सारं काही आलबेल सुरू असताना त्यांनी विभक्त होण्याचा घेतलेला निर्णय अनेकांच्या पचनी पडला नाही. दोघांच्या घट’स्फो’टाचे नेमके कारण समोर आले नसले तरी दोघांनीही हा घट’स्फो’ट स्वखुशीने घेत असल्याचे सांगितले. एका संयुक्त निवेदनात त्यांनी सांगितले, की “या १५ सुंदर वर्षांमध्ये आम्ही एकत्र आयुष्याचा अनुभव, आनंद आणि हास्य यांना अनुभवलं आहे. आमचे हे नाते विश्वास, आदर आणि प्रेमाने भरलेले राहिले आहे. आता आम्ही आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करणार आहोत.”

दोघे वेगळे झाले असले तरी आपला मुलगा आझादचा सांभाळ ते एकत्र करतील असे त्यांनी सांगितले आहे. घट’स्फो’ट झाल्यानंतरही अनेकदा ते एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांना त्यांच्या एका मित्राच्या लग्नात एकत्र पाहण्यात आलं होतं. घट’स्फो’टाच्या आदल्या दिवशीही त्या दोघांना आझादबरोबर बघण्यात आलं होतं. नुकतेच ते दोघे एक रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलेलं होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना फोटोसाठी पोजही दिली. त्यांचे हे फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत.

अलीकडेच व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये किरणला पाहून अनेक लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तिचे सगळे केस पांढरे झालेले पाहून तिची ही काय अवस्था झाली आहे, असे नेटकरी विचारत आहेत. तर काहींनी तिला पाहून तिच्या तब्येतीबाबत चिंता दर्शवली आहे. अनेकांना तर ती ओळखूच आली नाही. ‘नक्की काय झालं आहे?’ असा प्रश्न नेटकरी विचारू लागले आहेत.

आमिर आणि किरणला घट’स्फो’टानंतरही एकत्र पाहून नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत. दोघांच्या नात्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उठलेलं पाहायला मिळत आहे. ‘दोघांचे एकमेकांवर प्रेम होते, तर घट’स्फो’ट कसा झाला?’, ‘लग्नानंतरही दोघे एकत्र रहात आहेत का?’ असे आणि अशा प्रकारचे बरेच प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. त्यांचं पती-पत्नी म्हणून संपलेलं नातं आणि त्यानंतर त्यांच्यात असलेलं नातं याबाबत नेटकऱ्यांना बरेच प्रश्न पडलेले पाहायला मिळत आहेत.

लग्नानंतरच्या आपल्या या नव्या नात्याबद्दल आमिर आणि किरण दोघांनीही मोकळेपणा ठेवला आहे. पती-पत्नी म्हणून विभक्त झाले असले तरी नव्या प्रोजेक्ट्स वर ते एकत्रितपणे काम करतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आमचे हे नवे नाते हे सह-पालकत्वाचे आणि कौटुंबिक असेल, असेही त्यांनी सांगितले. आपल्या या नव्या नात्याकडे एक शेवट म्हणून न पाहता दोघेही एक नवी सुरुवात म्हणून पाहात आहेत.