आमिर खानने केलं फातिमा सना शेख सोबत तिसरं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचे कारण…

सध्या अभिनेता आमिर खान अनेक गोष्टींमुळे चर्चेत असलेला पाहायला मिळत आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्या आधी तो त्याच्या किरण राव बरोबरच्या घटस्फोटामुळे चर्चेत आला होता. दोघेही घटस्फोट घेत वेगळे झाले मात्र अनेक ठिकाणी दोघांना एकत्र पाहण्यात आले आहे. मात्र या घटस्फोटानंतर आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाच्या बातम्या रंगू लागल्या आहेत.

त्यावेळी आमिर खान अभिनेत्री फातिमा सना शेख बरोबर लग्न करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. या दोघांचे अफेयर सुरू असल्याचेही बोलले जात होते. मात्र दोघांनीही यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच आता आमिर खान आपला ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर म्हणजेच एप्रिल नंतर आपल्या तिसऱ्या लग्नाची घोषणा करेल असेही बोलले जात आहे. मात्र आता अचानक त्याच्या आणि फातिमा सना शेखच्या लग्नाचे फोटो समोर आल्याने चाहत्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

सध्या आमिर आणि फातिमाचा हा फोटो सोशल मीडिया वर चर्चेचा विषय बनला आहे. एका फेसबुक पेज वर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटो मध्ये फातिमाने साडी नेसली असून आमिर देखील हटके लूक मध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे, की ‘फातिमा शेख ही तीच अभिनेत्री आहे जिने दंगल चित्रपटात आमिरच्या मुलीची भूमिका केली होती. चित्रपटात फातिमाने गीता फोगटची भूमिका साकारली होती. अभिनेत्री आमिर खानची तिसरी पत्नी बनली आहे. असो, ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण सत्यमेव जयतेचा प्रचार करणारा आमिर खान त्याच्या अनेक विवाह आणि पत्नींवर काही बोलणार आहे का?’

या फोटोसोबत दिलेली माहिती किती खरी आहे, याबाबत अजून कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा फोटो बनावट असल्याचे लक्षात आले आहे. या फोटोसोबत छेडछाड करण्यात आल्याचे दिसते. आमिर आणि फातिमाचा व्हायरल होणारा हा फोटो मूळचा आमिर आणि किरण रावचा आहे. आकाश अंबानी याच्या लग्नातला हा फोटो असून त्यावेळी आमिर आणि किरण यांचा घटस्फोट झालेला नव्हता. या फोटोमध्ये आमिर आणि किरण एकमेकांशेजारी उभे आहेत. किरणच्या फोटोच्या जागी फातिमाचा फोटो लावत हा फोटो व्हायरल करण्यात आल्याचे कळते.

आमिर आणि फातिमाने यावर कोणतेही अधिकृत भाष्य केले नसले तरी आमिरच्या जवळच्या मंडळींनी ही केवळ एक अफवा असून आमिर योग्य वेळी या प्रश्नांना उत्तरे देईल असे सांगितले.