शाळेची पायरी न चढलेल्या आपली आजी या युट्युब चॅनेल बद्दल माहिती आहे का..? परदेशात विकले जाते आजीचे पदार्थ.

पैसा आणि प्रसिद्धी मिळवायची म्हटली ही स्वतःच्या अंगात एक कला असावी लागते एखादी गोष्ट लोकांना विकायची म्हटली की लोकांना ती कशी विकावी लोकांना त्या वस्तू बद्दल आकर्षण कसे निर्माण करावे हे आपल्या हातात असते. ते म्हणतात ना पैसा आणि प्रसिद्धीसाठी कोणत्याही वयाची अट नसते ती कधीही केव्हाही लाभू शकत.

आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्ती बद्दल सांगणार आहोत ज्यांनी शिक्षणाच्या वाटेवर कधीच पाऊल ठेवले नाही तरीही त्यांनी आज खूप पैसा आणि प्रसिद्धी मिळाली आहे आम्ही ज्या व्यक्ती बद्दल सांगत आहोत ती व्यक्ती म्हणजे एक आजी आहे या आजीने जास्त वयात खूप सारी प्रसिद्धी आणि पैसा मिळवला आहे. आपली आजी म्हणून त्यांचा खाद्यपदार्थ खूप ठिकाणी लोकप्रिय आहे. आज याच आजीबद्दल आम्ही जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया..

आपली आजी म्हणून ओळख मिळवलेल्या या आजीचे खरे नावसुमन गोरक्षनाथ धामणे असे आहे. अहमदनगर मधील कासारसारोळा या गावातील रहिवासी असणाऱ्या आपली आजी या आजीचे वय ६५ वर्षे आहे. घरात मोठी बहीण आणि वहिनी यांच्याकडून लहानपणापासूनच जेवण बनवायचे धडे त्यांनी घेतले होते. सुमन बाईंनी कधीही शाळेची पायरी चढली नाही. पण तरीही आज त्या लोकप्रिय आहेत. सुमनबाई यांचा विवाह एका पोलिसाशी झाला. पती पोलीस असल्यामुळे घरात त्यांना खूप सारा वेळ मिळायचा.

घरात वेळ मिळाल्यामुळे सुमनबाई यांनी या वेळेचा सदुपयोग करत आजूबाजूंच्या महिलांना घेऊन खाद्य निर्मिती ला सुरुवात केली. अचानक एके दिवशी त्यांचा नातू यश फाटक त्यांच्या घरी आल्यानंतर त्याने आग्रहाने आजीला पावभाजी करण्यास सांगितले. त्यावर आजी म्हणाल्या की मला पावभाजी बनवता येत नाही त्यावर यशने डोके लावत युट्युब वरून पावभाजी बनवण्याची रेसिपी आजीला सांगितली. आजीबाईनी ती रेसिपी पाहून बनवली सुद्धा आणि ती रेसिपी सर्वांना आवडली.

नातू यश फाटक यांच्या सांगण्यावरून त्यांनी युट्युबसाठी रेसिपी बनवण्यास सुरुवात केली. सुमन आजींना खूप सार्‍या रेसिपी बनवता येत नव्हत्या त्यांनी जिद्दीने शिकण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला ते मोबाईलवर रेसिपी चे व्हिडिओ पाहत नंतर ते बनवून लोकांना आपले रेसिपी चे पदार्थ दाखवत. बघता बघता खूप सार्‍या लोकांना सुमन आजीची रेसिपी आवडायला लागली कमी वेळातच त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली.

सुरुवातीला त्यांच्या यूट्यूब चॅनल खूप यश मिळवले पण नंतर त्यामध्ये थोडासा अडथळा आला, सुमन आजी यांचे यूट्यूब चैनल एक झाले त्यानंतर सुमन आजी खूप घाबरून गेल्या त्यानंतर नातू यशने खूप प्रयत्न करून ते चैनल पुन्हा मिळवले. पुन्हा आजीबाई जोमाने काम करू लागल्या. आज आजीबाईंचे १० लाखाहून अधिक युट्युब वर सबस्क्राईबर आहेत.

View this post on Instagram

A post shared by Suman Dhamane (@aapli_aaji)

वर्षभरात आजीने तीस ते चाळीस लाखापर्यंत मसाल्यांचा व्यवसाय होतो. हे मसाले भारताबाहेरील देशात सुद्धा जातात. या आजीने खऱ्या अर्थाने दाखवून दिले की शिक्षण केले तरच पैसा आणि प्रसिद्धी मिळते असे नसते. त्यामुळे अशा आजीला सलाम!