मराठी बिग बॉस नंतर आता अभिजित बिचकुले झळकणार हिंदी बिग बॉस मध्ये..जाणून घ्या सविस्तर माहिती..

मित्रहो मराठी बिग बॉस हा शो अवघ्या महाराष्ट्राचा आवडीचा बनत चालला आहे, या शोमुळे अनेकजण मनोरंजीत होत असतात. यामध्ये येणारे स्पर्धक चांगलेच प्रसिद्ध होतात, यातूनच प्रसिद्ध झालेला एक स्पर्धक म्हणजे अभिजित बिचकुले होय. त्याने मराठी बिग बॉस मध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. आता अभिजित जातोय हिंदी बिग बॉस शोमध्ये. रियालिटी शो बिग बॉस १५ मध्ये वा’द’ग्र’स्त अभिजीतची एन्ट्री होणार असल्याची बातमी ऐकून अनेकजण या शोसाठी आणखीन उत्सुक झाले आहेत.

अभिजित मराठी बिग बॉस शोमध्ये भरपूर चर्चेत होता, त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो नेहमीच रसिकांच्या नजरेत असतो. अनेकांचे तो लक्ष वेधून घेत असतो, त्यामुळे त्याची ही नवी एन्ट्री सुद्धा भलतीच चर्चेत आली आहे. अभिजित आता विकेंड वॉर मध्ये रश्मी देसाई,आणि देवोलिना भट्टाचार्य सोबत एन्ट्री घेणार आहे. सलमानच्या या शोमध्ये येण्यापूर्वी त्याला आपण मराठी बिग बॉस या शोमध्ये पाहिलेच होते. त्याच्या वादामुळे हा शो बघण्यासाठी अनेकजण उत्सुक असायचे.

अभिजित ने मराठी बिग बॉस शोमध्ये खूप जास्त धुमाकूळ घातला होता, त्याने मराठी बिग बॉसचा स्पर्धक असतांना तुरुंगाची हवा देखील खाल्ली आहे. चेक बाऊन्सच्या प्रकरणात त्याला तुरुंगात जावं लागलं होतं. त्यावेळी अनेकांचे लक्ष त्याच्याकडे वेधले होते, कारण अभिजितला त्यावेळी पोलीस बिग बॉस मराठी २ च्या सेटवरून घेऊन गेले होते. अगदी सगळ्यांनी हा नजारा पाहिला होता, अनेकजण त्यावेळी थक्क झाले होते. तेव्हा सातारा कोर्टाकडून त्याच्या विरोधात अटक वॉरंट जाहीर झाले होते.

अटकेच हे प्रकरण २०१५ मधील होते, तेव्हाची ही बाब असून त्याला सेटवरून अचानक नेल्याने अनेकजण त्यावेळी चकित झाले होते. कोर्टात हजत न राहिल्याने त्याला अटक करण्यात आली होती, शिवाय त्याच्या बाबतीत आणखी एक थक्क करणारी बाब म्हणजे त्याने नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत. पण त्याला आजवर कोणतीच निवडणूक जिंकता आली नाही.

बिग बॉस शोमध्ये तो खूप चर्चेचा विषय बनुन राहिला होता, त्याची अस्ताव्यस्त भाषा, वाईट भाषा आणि जबरदस्ती गोंधळ करण्यामुळे प्रसिद्धी वाढली होती. त्यामुळे आता तो सलमानच्या शोमध्ये काय आणि कसा गोंधळ घालतो हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक आणि त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. तर मित्रहो तुम्हीही हा शो पहा, त्यामध्ये अभिजितचा खेळ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.