‘बिग बॉस १५’: अभिजीत बिचुकलेचे सलग सहा तास किसिंग सीन! धक्कादायक खुलासा…

‘बिग बॉस’ च्या घरात कधी काय घडेल, सांगता येत नाही. कधी एखाद्या टास्कमुळे नवीन चर्चेला सुरुवात होते, तर कधी स्पर्धकांमधील भांडणामुळे अजून एखाद्या नवीन वादाला तोंड फुटताना दिसतं. आता तर बिग बॉसच्या घरात एक धक्कादायक खुलासा होताना दिसणार आहे. कारण हा सगळा सेगमेंटच धक्कादायक खुलाशांचा असणार आहे. या सेगमेंट मध्ये तेजस्वी बिचुकले बद्दल एक धक्कादायक खुलासा करताना दिसणार आहे.

‘बिग बॉस मराठी सिझन २’ मधून नावारूपाला आलेला स्पर्धक म्हणजे अभिजीत बिचुकले. या सीझनमध्ये बोलण्याची शैली, आक्रमकपणा, विनोदी वृत्ती, दुसऱ्यांचे विनोद खिलाडूपणे घेण्याची वृत्ती यामुळे बिचुकले बरेच प्रसिद्ध झाले होते. मात्र हिंदी बिग बॉस मध्ये त्यांची डाळ काही शिजताना दिसत नाहीये. ‘बिग बॉस १५’ मध्ये अनके कारणांमुळे बिचुकले घरातील इतर स्पर्धकांच्या रोषाला सामोरे जाताना दिसत आहेत. यामध्ये महिला स्पर्धकांचा सहभाग जास्त आहे. मात्र आता एका वेगळ्याच कारणामुळे बिचुकले सध्या चर्चेत आलेले दिसत आहेत.

सोशल मीडिया वर ‘बिग बॉस १५’ च्या आगामी भागाचा प्रोमो दाखवण्यात आला आहे. यामध्ये ‘पर्दाफाश रिपोर्टींग’ असा एक सेगमेंट असणार आहे. या सेगमेंटमध्ये स्पर्धकांच्या बद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले जाणार आहेत. बिचुकले दादाने एका म्युझिक व्हिडिओ मध्ये चक्क ६ तासांचा किसिंग सीन केला होता, असा धक्कादायक खुलासा तेजस्वी प्रकाशने केला आहे. हा खुलासा ऐकून बिग बॉसच्या घरातील सदस्यांना खूपच धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by TejranLove2021 ❤️🔥 (@tejranlove_2021)

‘बिग बॉस १५’ च्या आगामी भागात काही पत्रकार स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसणार आहेत. यावेळी रश्मी देसाई बिचुकले वर भडकलेली दिसते. बिचुकले महिलांबद्दल वाईट विचार करतात, असा आरोप रश्मीने केला आहे. रश्मीच्या या बोलण्यावर बिचुकलेना राग येतो. ते भडकून तिला बोलतात, “हे वारंवार बोलून माझी इमेज डॅमेज केली जात आहे.” यावर रश्मी बिचुकलेना इडियट म्हणते. उत्तरादाखल बिचुकले ‘तुझा संपूर्ण परिवार इडियट’ असे म्हणतात.

अभिजीत बिचुकले एवढ्यावरच थांबत नाहीत. ते आलेल्या पाहुण्यांशीही वाद घालताना दिसत आहेत. त्यावर सलमान खान त्यांना शांत राहण्याचा सल्ला देतो. एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे देवोलिना राखी सावंत बद्दल एक धक्कादायक खुलासा करते. राखी दोन दिवस तुरुंगात जाऊन आली आहे, असे ती म्हणते. आता यावर उत्तर देताना राखी काय म्हणते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.