१४ व्या वर्षीच अनाथ झालेला हा प्रसिद्ध अभिनेता एकेकाळी रस्त्यावर औषधे विकायचा, मात्र आज आहे कोट्यवधींचा मालक

बॉलीवूड चे  सर्वोत्तम कलाकार,अभिनेते अर्शद वारसी. यांचा अभिनय कौशल्य आपण पहिलेच आहे . आपल्या अतिउत्तम कॉमिक टाईमिंग मुळे यांनी प्रेक्षकांना खूप हसवले देखील आहे. मात्र यांचा जीवन प्रवास खुप सं घ र्षा ने भरलेला होता. एक अनाथ 14 वर्षाचा मुलगा ते सुप्रसिद्ध अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवासात त्यांना अनेक आ व्हा ने आली. 

आज आपण जाणून घेऊया अर्शद वारसी यांचा जीवनाबद्दल संपूर्ण माहिती.अर्शद यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ साली मुंबईच्या एका मुस्लिम परिवारात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अहमद अली खान असे होते. त्यांचे वडील वारिस पाक यांच्या सिद्धांतावर जगणारे होते. त्यामुळे त्यांचे आडनाव खान वरून वारसी असे झाले. आठ वर्षाचा वयातच अर्शद वारसी यांचा आई-वडीलांनी त्यांचा दाखला नाशिकच्या एका बोर्डिंग स्कूलमध्ये करून दिला होता.

बाहेर शिकत असल्यामुळे अर्शद वारसी आपल्या घरी फार कमी वेळा जात असत. अर्शद लहानपणापासूनच खेळ व क्रीडा मध्ये सक्रिय होते. ते मोठे होऊन जिम्नास्ट बनणार अशी त्यांची इच्छा होती मात्र यासाठी त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना परवानगी नाकारली. इतर पालकांप्रमाणे अर्शद वारसी च्या आई वडीलांनी देखील त्यांना अभ्यासावर लक्ष देण्याचा स ल्ला दिला.

अर्शद वारसी यांच्या वयाच्या १४ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे नि ध न झाले. अर्शद चे वडील घरातील एकमेव कमवते व्यक्ती असल्या मुळे त्यांच्या नि ध ना नंतर अर्शद वारसी यांच्या परिवारावर आर्थिक सं क ट येऊ लागली. यामुळेच हर्षद वारसी यांना हायस्कूल नंतर शिक्षण सोडावे लागले. वडिलांच्या नि ध ना च्या दुःखातुन बाहेरच येत होते तेवढ्यात दोन वर्षानंतर त्यांच्या आईचे देखील नि ध न झाले. याप्रकारे फक्त वयाच्या सोडाव्या वर्षीच अर्शद वारसी अनाथ झाले.

यानंतर अर्शद वारसीला यांना स्वतःचे तर लक्ष ठेवायचे होते मात्र त्या सोबत त्यांच्या लहान भावाची देखील काळजी घ्यायची होती. स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना काहीतरी काम करावे लागणार होते, त्यामुळे त्यांनी एका सेल्समनची नोकरी स्वीकारली. व ते घरोघरी जाऊन कॉ स्मे टि क्स विकत होते. यातून त्यांना परिश्रम घेऊन देखील योग्य तो मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली.

यानंतर त्यांनी एका फोटोलॅ ब येथे काम करणे सुरू केले या दरम्यानच डान्स करण्यात त्यांची रुची वाढत गेली. ते एवढ्या उत्तम प्रकारे डान्स करू लागले की त्यांना अकबर समी यांच्या सुप्रसिद्ध डान्स ग्रुप मध्ये डान्स करण्याची संधी देखील मिळाली. येथूनच अर्शद वारसी यांचे डांस करियर सुरू झाले . १९९१ सालच्या इंडियन डान्स प्रतियोगिते चे ते विजेते ठरले. अशाप्रकारे बऱ्याच ठिकाणी डान्स प्रतियोगिता जिंकून त्यांनी पैसे कमवायला सुरुवात केलेली होती.

या पैशांचा सदुपयोग करून करून त्यांनी स्वतःचा एक डान्स ग्रुप सुरू केला व या मध्येच एक मारिया नामक डांसर देखील होती जी पुढे जाऊन त्यांची जीवन साथीदार बनली.१९९3 मध्ये ‘रूप की रानी चोरो का राजा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी कोरियोग्राफी करून बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर अर्शद वारसी चित्रपटांमध्ये  लहान मोठे भूमिका साकारून अभिनय देखील करायला लागले.

२००३ हे वर्ष अर्शद वारसी साठी त्यांचा जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरले या वर्षी त्यांना राजकुमार हिरानी यांच्या “मुन्नाभाई एमबीबीएस” या चित्रपटात सर्किट हे पात्र मिळाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट राहिला व यामुळे अर्शद वारसी यांची लोकप्रियता खूप वाढली. यापुढे त्यांचे बॉलीवूड करिअर अतिशय उत्तम राहिले. यानंतर ‘रा स्क ल्स,गोलमाल सिरीज,धमाल ‘ यासारख्या कित्येक कॉमेडी चित्रपटांमध्ये त्यांनी स्वतःच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मने जिंकले.

अभिनयाच्या साहाय्याने त्यांनी बरीच आर्थिक संपत्ती देखील जमा केलेली आहे. अर्शद वारसी यांची नेट वर्थ ४०० करोड एवढे आहे. अर्शद वारसी यांना कार व बाईकचा खूप शोक आहे. ह ल्ली त्यांनी BMW F 750 ही ११. ९५ लाखाची मोटर सायकल खरेदी केलेली आहे. यासोबतच त्यांच्याकडे बऱ्याच फोर व्हीलर देखील आहेत.यातून एक म्हणजे audi Q7 जिची किंमत ८७ लाख रुपये एवढी आहे,व मुंबई येथे स्वतःचे घर देखील आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.