धक्कादायक..! या प्रसिद्ध अभिनेत्याचे अपघाती निधन…लाल किल्ला हिंसा प्रकरणात होते सहभागी..

मित्रहो नुकताच एक बातमी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, ही बातमी जाणणारा प्रत्येक जण दुःखी होत आहे. कारण ही बातमी कलाविश्वातील एका कलाकाराबद्दल आहे. पंजाब चित्रपट सृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेता दीप सिद्धू याचे अपघाती निधन झाले आहे. त्यामुळे चित्रपट सृष्टी तसेच त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. ही बातमी अनेकांसाठी धक्कादायक आहे, कारण असे अचानक होईल याची कल्पना देखील कोणी केली नसावी त्यामुळे दीप ला गमावून अनेक रसिक निराश झाले आहेत.

दीप एका स्कॉर्पियो गाडीतून निघाला होता, याच दरम्यान रस्त्याच्या कडेल असलेल्या ट्रकला अचानक त्याच्या गाडीची धडक लागली. हा सर्व प्रकार सोनिपत जिल्ह्यामध्ये झाला असून हा अपघात खूप मोठा होता. यामध्ये अभिनेत्याने आपला जीव गमावला आहे, त्यामुळे सोनिपत जिल्ह्यातील वातावरण सुद्धा आता खुप दुःखी झाले आहे. दीप चे शव पोस्टमार्टम साठी नेण्यात आले आहे, हे शव खरखोदा येथील सरकारी दवाखान्यात नेले आहे. तसेच त्याच्या गाडीवर एक महिला देखील त्याच्या सोबत होती.

दीप सोबत असलेल्या महिलेचा सुद्धा अपघात झाला आहे, मात्र तिची स्थिती चिंताजनक आहे. हा अपघात खरच खूप भयानक म्हणावा लागेल कारण यामध्ये दीप ने आपला जीवच गमावला आहे. हल्ली असे अनेक अपघात होत आहेत, याचे दिवसेंदिवस प्रमाण वाढतच आहे. पण त्यामुळे माणसाचा जीव, प्राण म्हणजे साधी बाब होऊन गेली आहे. अपघातात काहींचे प्राण जातात तर काहीजण गंभीर जखमी होतात. पण याहूनही वाईट परिस्थिती त्यांची होते जे आपले हात पाय किंवा अन्य अवयव गमावतात.

मित्रहो दीप एक उत्तम कलाकार होता, त्याने अनेक चित्रपटात काम केले असून भरपूर लोक त्याचे चाहते आहेत. तसेच तो आणखी एका कारणाने खूप प्रसिद्ध आहे ते म्हणजे दिल्ली येथील किसान आंदोलन मध्ये १६ जानेवारीला लाल किल्ल्यात झालेला हिंसाचार, होय या हिंसाचारात जेवढ्या पण लोकांची नावे आली होती त्यामध्ये दीप सुद्धा सहभागी होता. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती, पण नंतर त्याला बेल मिळाली. या प्रकणात नाव आल्याने अनेकजण त्याला जास्त ओळखतात.

तसेच दीपने आपल्या भूमिकांच्या जोरावर देखील अनेक चाहते कमावले आहेत. त्याच्या अशा अचानक जाण्याने अनेकजण फार दुःखी आहेत. सोशल मीडियावर देखील त्याला भरपूर लोक श्रद्धांजली वाहत आहेत. एका तरुण, मेहनती अभिनेत्याला गमावल्याने चित्रपट सृष्टीला देखील दुःख होत आहे. पण मित्रहो जरी दीप आता आपल्यात नसला तरीही त्याच्या भूमिकांतून तो नेहमीच आपल्या सोबत राहील. आमच्याकडूनही दीप ला भावपूर्ण श्रद्धांजली !!