फ्लॉ’फ फिल्म्स देऊन करियर केले बरबाद तरीही जगतो अभिनेता आफताब शिवदासानी लग्जरी लाईफ, दोन वेळा केले लग्न..

बॉलीवूड हा जितका मेहनतीचा खेळ आहे तितकाच नशिबाचा खेळ आहे. या क्षेत्रात काही जण खूप पुढे जातात पण काही जण तसेच मागे राहून जातात. या क्षेत्रात टिकण्यासाठी स्टार्सना सतत आपल्या चाहत्यांना काही ना काही नवीन द्यावे लागते. बऱ्याच जणांनी या दुनियेत आपला शिक्का आजमावला पण काहींनाच इथे फार काळ टिकता आले.

काही काहींच्या बाबतीत असे घडले आहे की सुरुवातीच्या काळात त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली. ते लाईमलाईटमधे राहिले. पण नंतरच्या काळात त्यांना तितके चित्रपट मिळाले नाहीत आणि काळाला त्यांचा विसर पडला. असाच एक काळाच्या प्रवाहात स्वतःची ओळख गमावून बसलेला अभिनेता म्हणजे आफताब शिवदासानी!

आफताब शिवदासानी हा बॉलीवूडमधला अत्यंत प्रसिद्ध अभिनेता आहे. पण सध्या तो अगदीच तुरळक सिनेमांमधे दिसून येतो. त्याचा जन्म २५ जून १९७८ मध्ये मुंबई येथे झाला. नुकताच त्याचा ४३ वा वाढदिवस त्याने साजरा केला. सेंट जेव्हिअर स्कूल मधून त्याने त्याचे शालेय शिक्षण घेतले तर एच आर कॉलेज अॉफ कॉमर्समधून तो पदवीधर म्हणून बाहेर पडला.

आफताब शिवदासानी याने अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. त्याचा पहिला चित्रपट हा मिस्टर इंडिया हा होता. त्यात त्याने अनिल कपूरसोबत काम केले होते. इतकेच नाही तर खुद्द अमिताभ बच्चन यांच्या शहंशहा या चित्रपटातही त्याने बाल कलाकार म्हणून काम केले होते. पुढे त्याच्यातले हेच टॅलेंट पाहून राम गोपाल वर्मा यांनी १९९९ साली त्याला त्यांच्या “मस्त” या सिनेमात काम दिले.

मस्त या सिनेमातून वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी आफताब याने बॉलीवूडमधे खऱ्या अर्थाने पदार्पण केले. मस्त हा सिनेमा सुपरहिट ठरला. यात त्याने उर्मिला मातोंडकर यांच्या अपोझिट काम केले. यानंतर त्याने क’सूर हा चित्रपट केला. क’सूर हा चित्रपट विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. कसू’र असो किंवा हंगामा असो किंवा मस्त असो या तिन्ही चित्रपटांनी दणकावून यश मिळविले.

त्यानंतर लव के लिए कुछ भी करेेगा, प्यार इश्क और मोहब्बत, कोई मेरे दिल से पूछे, क्या यही प्यार है, आवारा पागल दीवाना आणि प्यासा अशा अनेक चित्रपटांतून त्याने भूमिका केल्या. पण दुःखद गोष्ट म्हणजे काही काळानंतर आफताबला सिनेमे मिळाले नाहीत आणि त्याची ओळख मिटायला लागली. तरीही अलिकडेच ग्रँड मस्ती या चित्रपटात तो रितेश देशमुख सह अभिनय करताना दिसला होता.

या चित्रपटातील अनेक सिन्समधे आफताबने भरपूर कॉमेडी केली होती. पण त्याच्या एकंदर कमी झालेल्या वावरामुळे तो लोकांच्या फारसा लक्षात राहिला नाही. असे असले तरीही त्याच्या प्रोडक्शन हाऊसमधून तो प्रचंड पैसे कमावतो आहे आणि अलिशान जीवन जगतो आहे.

आफताबने २०१२ साली निन दुसांज हिच्याशी एंगेजमेंट केली. त्यानंतर २०१४ साली त्यांनी एकमेकांशी विवाह केला. पण वयाच्या ३८ व्या वर्षी आफताबने परत एकदा तिच्याशी लग्न केले. एकाच पत्नीशी त्याला दोन वेळा विवाह करावा लागण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्याची यामागे काहीतरी महत्त्वाची वैयक्तिक कारणे नक्कीच असावीत.

अजूनही आफताबचे करिअर पूर्णपणे संपलेले नाही. एखादा साजेसा रोल मिळाल्यास तो पुन्हा एकदा सिनेसृष्टीत हरवलेली ओळख काबीज करू शकतो.