ये हुई ना बात! प्रसिद्धीचा विचार न करता अल्लू अर्जुनने चक्क हातगाडीवर खाल्ला डोसा..पहा विडिओ..

बॉलिवूड विश्वातील कलाकार हे त्यांच्या कारकीर्दीसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. त्यांचा एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला की, सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा सुरू असते. अनेक कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसेच त्यांच्या आलिशान आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असतात. प्रत्येक स्टारची एक वेगवेगळी ओळख आणि जीवन शैली असते. त्यामुळे चाहत्यांच्या मनावर अनेक स्टार राज्य करत असतात. या स्टार कलाकारांच राहणीमान म्हणजेच लाइफस्टाइल इतकी उंचवलेली असते की, साध त्यांना पाहायचं किंवा भेटायचं म्हटल, तरी देखील मोठ-मोठ्या ठिकाणी सर्वसामान्यांना जावे लागते.

एखाद्या लोकल ठिकाणी रस्त्यावर किंवा बाहेर कुठेही एखाद्या मोठ्या कलाकाराला भेटणे अशक्यच असते. मात्र, आता नुकताच एक स्टार चर्चेचा विषय ठरत आहे. तुम्हाला देखील हे जाणून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा स्टार त्याचा स्टारडम आणि प्रतिष्ठा विसरून चक्क रस्त्यावरच्या एका हात गाडीवर मसाला डोसा खाताना दिसत आहे. ही प्रचंड आश्चर्यकारक बाब आहे. कारण आपल्या सर्वानाच हे माहीत आहे की, एखाद्या मोठ्या स्टारला कोणताही पदार्थ खायचा असेल, तर त्यांच्यासाठी त्यांचे वैयक्तिक शेफ असतात ते बनवून देत असतात. हे स्टार त्यांच्या फिटनेससाठी प्रचंड काळजीपूर्वक कोणताही पदार्थ खात असतात. 

दाक्षिणात्य सुपरस्टार आणि सर्वात लोकप्रिय असलेला अभिनेता अल्लू अर्जुन हा त्याच्या फिल्मी कारकिर्दीमुळे नेहमीच चर्चेत असतो. आता त्याने भलतेच असे काही केले की, तो आता त्याच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या सज्ज झाला आहे. त्याने आपल्या प्रसिद्धीचा विचार न करता थेट हातगाडीवरील मसाला डोशाची चव घेऊन सर्वांनाच हैराण केलं आहे. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने हातगाडीच्या मालकाची कामात मदत देखील केली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल, तर अल्लू अर्जुन आता त्याचा आगामी चित्रपट ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्या या चित्रपटाचं शूटिंग आंध्र प्रदेशमध्ये सुरू आहे. त्याचवेळी तो जंगलातून जात असताना त्याला भूक लागली आणि जवळच त्याला मसाला डोशाची हातगाडी दिसली त्यावेळी त्याने कोणताही विचार न करता गाडी थांबवून डोसा खाल्ला.

त्यानंतर अल्लू अर्जुनने डोसा खाताना त्या विक्रेत्याची संवाद साधत त्याच्या आर्थिक परिस्थितीची विचारपूस केली. त्यानंतर अल्लू अर्जुन त्याला हजार रुपये देत होता. परंतु तो डोसा विक्रेता देखील खूप स्वाभिमानी होता. त्याने हे पैसे नाकारले. त्यानंतर अल्लू अर्जुन त्याला म्हणाला की, तुम्ही माझी हैद्राबाद येथे येऊन भेट घ्या. अल्लू अर्जुनच्या याच स्वभामुळे स्टारडम राखून ठेवून शकत आहे. अल्लू अर्जुनचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे चाहते त्याने सोशल मीडियावर त्याची पोस्ट पाहण्यासाठी तसेच नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात.