मुलगी झाल्यास एक रुपये देखील बिल न घेणाऱ्या ‘या’ डॉक्टर आता पर्यंत २००० पेक्षा जास्त प्रसूती मोफत केल्या आहेत..

आजकालच्या आधुनिक युगात देखील भारतीय संस्कृतीमध्ये अनेजण मुलांना वंशाचा दिवा मानतात. मात्र, मुलगी देखील आपल्या वंशाची पणती आहे हे मानण्यास अनेकजण तयार नाहीत. मुलगी ही लोकाची धन समजणार हा समाज मुलगी जन्माला येण्याआधीच तिची हत्या केली जाते. आजही अनेकजण स्त्रीभ्रूण हत्या करून चिमुकल्या मुलींच आयुष्य फुलण्याआधीच हिरावून घेतात. मात्र, आपल्या समाजात अशी देखील माणस आहे की, मुलगी जन्माला आल्यास तिचे स्वागत करून प्रचंड आनंद साजरा करतात.

आज आपण अशाच एका महान व्यक्ती बद्दल बोलणार आहोत. त्यांनी मुलगी होण्याचं महत्व त्यांच्या कृतीतून दाखवून देत आहेत. मुलगी ही तिच्या कुटुंबासाठी समाजासाठी किती महत्वाची आहे हे दाखवून देत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वंजारवाडी गावाच्या अत्यंत गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत डॉक्टर पर्यंतचा प्रवास केला. गणेश राख यांची पहिलवान होण्याची इच्छा होती. मात्र, गरिबीतून शिक्षण घेत डॉक्टर बनले आणि गावाकडे येवून सेवा करण्याचा निर्णय घेतला. परंतू, गावामध्ये माणस नसल्याने ओस पडली होती म्हणून त्यांना पुण्यात यावं लागले.

पुण्यात आल्यानंतर डॉ. गणेश राख यांनी 2007 साली हॉस्पिटल चालू केले. हॉस्पिटलमध्ये रुग्ण संख्या वाढली त्यामुळे हॉस्पिटल मोठ करण्यात आले. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये डिलिवरी पेशंट घेतले जातात. डिलिवरी दरम्यान मुलगा झाला की नातेवाईक आनंदाने वेडे व्हायचे. लगेच पळत म्हटल तरी त्याला पहायला यायचे. सर्वांना पेढे मिठाई वाटत आनंद साजरा करायचे. मात्र, मुलगी झाली तर हे सर्वच उलट व्हायचं. मुलगी झाली हे कळताच नातेवाईक कपाळावर आठ्या पाडायचे. तिला लवकर पाहायला देखील येत नसायचे. त्यानंतर बिल भरताना देखील हात आखडता घ्यायचे. काही वेळेस तर मुलगी देखील घरी घेवून जात नव्हते.

आजही आपल्या समाजात मुलीच्या बाबतीत असा भेदभाव केला जात आहे. त्यामुळे डॉ. गणेश राख यांनी मुलगी झाली की एक रुपया देखील बिल न घेण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर मुलगी झाली की तिचं भरभरून स्वागत करायला सुरुवात केली. याचा त्यांच्या हॉस्पिटलच्या उत्पन्नावर परिणाम होतो तरी देखील ते हे काम चळवळ म्हणून हाती घेतले. डॉ. गणेश राख यांनी 3 जानेवारी पासून ‘बेटी बचाव’चा नारा देत अभियानाला सुरुवात केली. हे अभियान आज जगभर पोहोचले आहे.

डॉ. गणेश राख यांनी आफ्रिका खंडात ‘बेटी बचाव’चा सर्वत्र नारा देत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 2000 मुलींचा जन्म झाला यातील एकही मुलीचं बिल घेतल नाही. डॉ. राख यांच्या या कामगिरीच कौतुक सोशल मीडियाद्वारे सर्वत्र केल झाल आहे. त्यांच्या ही कामगिरी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत गेली आहे. त्यांनी डॉ. राख यांच्या या कामगिरीचे कौतुक करत सत्कार करून स्विफ्ट डिझायनर ही कार भेट म्हणून मुंबई येथे दिली आहे. आजच्या युगात मुलीचे महत्व सर्वांना पटवून देत ही उल्लेखनीय कामगिरी करत जगासमोर एक आदर्श ठेवला आहे.