लक्झरी बंगले आणि हॉटेल यासह एवढ्या कोटीच्या घरात राहतात मिथुन, जगतात असे लक्झरी आयुष्य..पहा

एकेकाळचे बॉलीवूडचे सुपरस्टार आणि आजही आपल्या अभिनयाने कोट्यावधी चाहत्यांच्या ऱ्हदयात स्थान असलेले अभिनेते मिथून चक्रवर्ती हे एका नव्या कारणामुळे सध्या चर्चेत आले आहेत. अभिनय करून किंवा चित्रपटसृष्टीत जाऊन पैसा कमावता येतो का हा प्रश्न सतत चर्चिल्या जातो पण मिथून चक्रवर्ती यांच्याकडे असलेली गडगंज संपत्ती पाहिली तर अशा कित्येक आशाळभूत लोकांना त्यांच्या प्रश्नाचे ठोस उत्तर मिळेल आणि या क्षेत्रात पाऊल ठेवण्याची उर्मीही मिळेल.

मिथून चक्रवर्ती यांची सध्याची संपत्ती पाहिली तर कुणीही क्या बात क्या बात क्या बात म्हणल्याशिवाय राहणार नाही. त्रिवार क्या बात म्हणण्याचा ट्रेंडही खुद्द मिथून यांनीच डान्स इंडीया डान्स या रिअ‍ॅलिटी शो च्या माध्यमातून लोकांमधे रुजू केला.

मिथून चक्रवर्ती यांची सध्याची संपत्ती २५८ कोटी रुपये इतकी आहे. हा आकडा ऐकूनच सामान्य लोकांचे डोके गरगरायला लागेल. मिथून हे ख्यातनाम मोनार्क ग्रुप ऑफ होटल्स चे मालक आहेत. मिथून यांनी त्यांचा बराच पैसा हा होटेलिंगमधे गुंतवल्याचे दिसून येते.

इतकेच नाही तर उटी, म्हैसूर आणि मसीनागूडी या ही पर्यटनस्थळांवर मिथून चक्रवर्ती यांचे होटेल्स आहेत. मिथून यांच्या मसीनागूडी इथल्या होटेलबद्दल सांगायचे झाल्यास तेथे १६ अलिशान एसी खोल्या, १४ ट्विन्स मचांस, ४ स्टँडर्ड रूम्स, चिल्ड्रेन प्ले ग्राउंड यासह हॉर्स राइडिंग आणि जीप मधून जंगलाची राइड अशा दर्जेदार सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही कधी पर्यटनाच्या निमित्ताने मसीनागूडीला गेलात तर या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता.

त्यांच्या म्हैसूर इथल्या हॉटेलबाबत बोलायचे झाल्यास 18 वेल फर्निश्ड एसी कॉटेज, 2 एसी सुइट्स, ऐसपैस स्विमिंग पूल, पूल टेबल यासह अनेक ट्रेवल रिलेटेड सुविधा उपलब्ध आहेत. मिथून चक्रवर्ती यांना त्यांचे चाहते मिथून दा असं संबोधन वापरतात. यामागचं कारण त्यांच्या या यशाकडे पाहून कळून येतं. हॉटेलिंगबरोबरच छंद म्हणून मिथून दा कुत्रे पाळतात. सध्या मिथून दा हे ७६ कुत्र्यांचे मालक आहेत.

मिथुन दा यांचा परिवार एका पत्नीसह तीन मुले व एक मुलगी असा आहे. त्यांचा मुलगा मिमोह याचे नुकतेच लग्न झाले आहे व सून मदालसा ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मिथून दा हे फक्त पैशानेच नाहीत तर ऱ्हदयानेही श्रीमंत आहेत.

मिथून दा यांची एकमेव मुलगी दिशानी हिला त्यांनी दत्तक घेतले आहे. असेही सांगण्यात येते की ती त्यांना कचऱ्याच्या डब्ब्यात सापडली होती. तिथून त्यांनी तिला उचललेलाणि तिची जन्मभराची जबाबदारी घेतली.

मिथून चक्रवर्ती यांचे मूळ नाव गौरांग चक्रवर्ती असे आहे. त्यांनी वयाच्या २६ व्या वर्षी मृगया या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या अफलातून अभिनयाचा अविष्कार दाखवत वारदात, अविनाश, जाल, डिस्को डांसर, भ्र’ष्टाचार, घर एक मंदिर, वतन के रखवाले, हमसे बढ़कर कौन जैसी अशा एकाहून एक सुपरहिट चित्रपटांची रांग लावली.

त्यांच्या ‘आय यम अ डिस्को डान्सर’ या गाण्याचे चाहते आजही पाहायला मिळतात. आजही ते गाणे तितकेच प्रसिद्ध आहे. पण १९९३ ते १९९८ या काळात मिथून यांच्या करिअरला ग्रहण लागले होते. त्यांचे एकामागे एक तबब्ल ३३ सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉ;प ठरले. पण त्यांनी हार मानली नाही आणि ते सतत काम करत राहिले. त्यांच्या या जिद्दीने त्यांना लागलेले ग्रहण दूर केले आणि ते परत एकदा सुपरस्टार बनले. पुढे चालून मिथून हे फक्त उत्तम अभिनेतेच नाहीत तर उत्तम बिझनेसमनही ठरले.