रिअल लाईफ थलायवा! अभिनेता रजनीकांत यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून धक्का बसेल…

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल काही बोलताना शब्द कमीच पडतात. त्यांनी आजपर्यंत चित्रपटसृष्टीमध्ये इतकं काम करून ठेवलं आहे, की दक्षिणेतील प्रेक्षक त्यांना चक्क देवासमान मानतात. रजनीकांत यांनी आजपर्यंत १६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. तमिळ, कन्नड, हिंदी, तेलगू, मल्याळम अशा भाषांमध्ये काम करत त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तमिळ चित्रपटसृष्टीतील त्यांचे काम प्रचंड आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)

१२ डिसेंबर १९५० रोजी रजनीकांत यांचा जन्म बंगलोर, कर्नाटक येथे झाला. शिवाजी राव गायकवाड असे नाव असलेला माणूस पुढे आपल्या अभिनय कौशल्याने रजनीकांत नावाचा सुपरस्टार बनला. त्यांचा बस कंडक्टर ते सुपरस्टार हा प्रवास खूपच रंजक आणि प्रेरणादायी आहे. आपल्या अभिनय कौशल्याने रजनीकांत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहेत. त्यांना खऱ्या आयुष्यात त्यांचे चाहते ‘थलायवा’ म्हणून बोलावतात. रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे हमखास यश असे समीकरण चित्रपटसृष्टीत रूढ झाले आहे.

आज चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये रजनीकांत यांचे नाव घेतात. रजनीकांत यांची एकूण संपत्ती प्रचंड आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून ऐकणाऱ्याचे डोळेच फिरतील. रजनीकांत आपल्या एका चित्रपटासाठी ५० ते ६० कोटी रुपये इतके मानधन आकारतात. एका रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती ही जवळपास ३६५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. काय मंडळी, बसला ना धक्का?

हे तर काहीच नाही. चेन्नईमध्ये रजनीकांत यांचा एका आलिशान बंगला आहे. २००२ मध्ये हे घर बांधण्यात आले होते. काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या घरासाठी प्रचंड खर्च करण्यात आला होता. शिवाय रजनीकांत यांना गाड्यांचा खूप शौक आहे. त्यांच्याकडे आलिशान महागड्या गाड्यांचा एक आख्खा ताफाच आहे. या ताफ्यात टोयोटा इनोव्हा, रेंज रोव्हर, बेन्टली अशा आलिशान गाड्यांचा समावेश आहे. आपल्या एकूण संपत्तीतील काही रक्कम रजनीकांत यांनी मालमत्ता खरेदीत गुंतवली आहे. ही रक्कम जवळपास १०० कोटी रुपये इतकी आहे.

१९७५ मध्ये ‘अपूर्व रांगंगल’ या तमिळ चित्रपटातून रजनीकांत यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. तेव्हापासून अनेक चित्रपटांमध्ये काम करत त्यांनी आपल्या कष्टाने ही संपत्ती जमवलेली आहे. नुकताच त्यांनी आपला ७१ वा वाढदिवस साजरा केला. या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे. अलीकडेच त्यांचा ‘अन्नात्थे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील त्यांच्या कामाचे खूप कौतुक करण्यात आले.