अभिनेता राजकुमार आणि त्याची पत्नी होत आहेत ट्रोल..? व्हायरल झालेले फोटो पाहून नेटकरी नाराज…

मित्रहो आपल्या अतरंगी अभिनयातून नेहमीच चर्चेत येणारा अभिनेता राजकुमार आणि त्याची पत्नी पत्रलेखा नुकताच लग्नबंधनात अडकले आहेत. त्या दोघांच्या आयुष्याला एक नवी सुरुवात झाली आहे. ही जोडी बॉलिवूड मधील अनेक लोकप्रिय जोडीमधील एक आहे, या जोडीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो शेअर करून नुसता धुमाकूळ घातला आहे. यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्या फोटोला लाईक्स आणि कमेन्ट दिली आहे. मात्र नुकताच या जोडीने असे काही फोटो शेअर केले आहेत की ते पाहून ट्रोल होण्याची वेळ आली.

मित्रहो राजकुमार आणि पत्रलेखा या दोघांनी काही फोटो शूट केले आहेत, पण यामध्ये पत्रलेखाची पोज नेटकऱ्यांना नाराज करत आहे. तुम्ही फोटो मध्ये पाहू शकता की अभिनेता राजकुमारने आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या सोबत त्याची पत्नी पत्रलेखा देखील दिसत आहे. पत्रलेखाने या फोटोमध्ये जी पोज दिली आहे ती लवकर लक्षात येत नाही, मिरर रिफ्लेक्शन मुळे ही पोज खूपच विचित्र वाटत आहे. त्यामुळे पोज पाहणाऱ्यांना देखील फोटो आवडला नाही.

जेव्हा आपण या फोटोवर सहज नजर टाकतो तेव्हा आपल्याला पत्रलेखाचा एक पाय दोन असल्यासारखे वाटतात. जेव्हा ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली तेव्हा अनेक नेटकऱ्यांनी यावर निरनिराळ्या कमेन्ट केल्या होत्या. पण मित्रहो जेव्हा आपण हा फोटो लक्ष देऊन पाहतो तेव्हा कळते की यामध्ये पत्रलेखाने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून काळ्या रंगाचे शूज घातले आहेत. दरम्यान अभिनेता राजकुमार अगदी सुंदर स्मितहास्य करून तिचा फोटो काढत आहेत.

तसे पाहिले तर या दोघांचा हा फोटो खूपच छान आला आहे, पण तो लक्ष देऊन पाहिल्यावर कळतो अन्यथा या फोटोतील पोज पाहून विचित्र कमेंट येत राहतील. या फोटोवर एक युजर म्हणतो की “मी विचारच करत बसलो होतो की ही नेमकी काय पोज आहे..?” , तर पुढे आणखीन एक युजर म्हणतो की “बायकोचे असे फोटो कोण काढतो..!” तसेच अजून एक मजेशीर कमेंट आली आहे “पत्रलेखाने डायपर घातले आहे का ?”. या सर्व कमेंट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

सोशल मीडियावर खूपच विचित्र कमेंट येत असल्याने अखेर राजकुमारने पत्रलेखाचा हा फोटो हटवला. मित्रहो राजकुमार आणि पत्रलेखा यांची मैत्री खूपच सुंदर आहे, तब्बल दहा वर्षे डेट केल्यानंतर ही जोडी लग्नबंधनात अडकली आहे.१५ नोव्हेंबर रोजी या दोघांनी अगदी पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. अभिनेता राजकुमारने अनेक भूमिका गाजवल्या आहेत, त्याचा भन्नाट अभिनय आपणाला “हम दो हमारे दो” या चित्रपटात कीर्ती सेनन सोबत पाहायला मिळाला होता. बघता बघता त्याचा चाहतावर्ग खूप वाढला आहे आणि पुढे देखील असाच वाढत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.