“झुंड” चित्रपटावर अभिनेता रितेश देशमुखने दिली अशी प्रतिक्रिया..सोशल मीडियावर चर्चेला उधाण..

मित्रहो मराठी रंगभूमीवर अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत, त्यामुळे रसिक मंडळी खूपच उत्सुक झालेली आहेत. नुकताच नागराज मंजुळे यांचा “झुंड” चित्रपट प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. नागराज नेहमीच एक आकर्षक कथानक घेऊन पडद्यावर हजर होत असतात. सहा वर्षापूर्वी त्यांनी “सैराट” चित्रपटातून आपल्या जीवनाची एक नवी सुरुवात केली होती, या चित्रपटाने मराठी कलाविश्वात निराळाच विक्रम गाजवला आहे. यातील कलाकार व नागराज मंजुळे यांचे आयुष्य या चित्रपटाने बदलून टाकले आहे.

त्यानंतर पुन्हा अगदी तशीच प्रचंड गर्दी थिएटर्स मध्ये पाहायला मिळत आहे, “झुंड” चित्रपट देखील काहीसा असाच लोकप्रिय होत आहे. चित्रपटाचे कथानक खूपच रंजक असल्यामुळे प्रेक्षक मंडळी यावर खूप चांगली प्रतिक्रिया देत आहेत. हा बहुचर्चित आलेला चित्रपट सोशल मीडियावर सुद्धा विशेष गुण दाखवत आपली चर्चा रंगवत आहे. तसेच यामध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील काम केले आहे, त्यामुळे तर आणखीनच हा चित्रपट उत्सुकता प्रकट करणारा ठरला आहे. शिवाय बॉक्स ऑफिसवर याने काहीच दिवसात भरगोस कमाई केली आहे.

या चित्रपटावर अनेकांनी प्रतिक्रिया दिली असून, यामध्ये मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख याची प्रतिक्रिया आता विशेष चर्चेत येत आहे. त्याने “झुंड” चित्रपट पाहिल्यानंतर नागराज मंजुळे यांना ट्विट करून चित्रपटाबद्दल खास प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की “स्वतःवर थोफी दया करा, आणि “झुंड” चित्रपट कृपया चित्रपट गृहात जाऊन पहा. नागराज मंजुळे देशातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे. तो तुम्हाला रडवतो, आनंद देतो, वेदनांचा अनुभव देतो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो तुम्हाला समाजातील भिंतीने विभागलेल्या दोन भारतांचा विचार करायला लावतो.”

“झुंड” चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी खूप चांगली प्रतिक्रिया दिली आहे, यामध्ये सिद्धार्थ जाधव,जितेंद्र जोशी, सुबोध भावे, यांच्या सोबतच अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसातच ६.५० कोटीची कमाई केली आहे. तर पाहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने १.५० कोटींची कमाई केली होती. शनिवारी २.१० कोटी तर रविवारी २.९० कोटींची कमाई केली होती. त्यामुळे गेल्या तीन दिवसात जवळपास ७ कोटींचा गल्ला मिळवला आहे. हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापकविजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.

“झुंड” चित्रपट ४ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. चित्रपट अमिताभ बच्चन, रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर एकत्र दिसून येत आहेत. त्यामुळे या कलाकारांची केमिस्ट्री खूपच सुंदर असून ती पाहण्यासाठी प्रेक्षक वर विशेष गर्दी करत आहे. यातील सर्व कलाकारांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो तुम्ही देखील “झुंड” चित्रपट नक्की पहा, तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.