मैं प्रेम रोगी। अजूनही कॅटरीनाला विसरू शकला नाही अभिनेता सलमान खान, लग्नानंतर सुधा ठेवतो कॅटरिना कैफ सोबत असले संबंध…

माणसाला एकदा का प्रेम झाले तो ते मग कधीच विसरू शकत नाही. माणूस प्रेमात इतका गुंतून जातो की त्याला इतरांची काळजी करणे सुचत नाही. बॉलीवूड मध्ये अशी काही नाती आहेत जी अपूर्ण राहिली आहेत त्यापैकी एक अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांची जोडी! सलमान खान ऐश्वर्या राय ला आज देखील विसरू शकला नाही आहे. तिकडे ऐश्वर्या राय सुधा सलमान खान वर खूप जीवापाड प्रेम करायची पण काही काळानंतर ऐश्वर्या राय ने सलमान खानला सोडून दिले. त्यानंतर सलमान खान कॅटरिना कैफ च्या प्रेमात पडला पण तिनेही त्याला काही काळानंतर सोडून दिले. जरी कॅटरिना कैफ आणि सलमान खान यांचे ब्रेकप झाले असले तरी आज देखील ते एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.

परंतु आता एक नवीन प्रश्न धुमाकूळ घालत आहे सलमान खान कॅटरिना कैफ ला फक्त आपली चांगली मैत्रीण मानतो का..? याबद्दल काही खुलासे एका चर्चेमुळे समोर आले आहेत. कारण मुंबई पोलीस च्या उमंग कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की सलमान कॅटरीनाला किती फॉलो करतोय ते.

याचबरोबर या कार्यक्रमादरम्यान कपिल शर्मा सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांच्या सोबत मस्ती करताना दिसत आहे. यावेळी कपिल शर्मा सलमान खान ला प्रश्न विचारतो की तू तुझ्या चाहत्यांचा फोटो झूम इन करून पाहतोस का..? यावर अतिशय मजेशीर पद्धतीने उत्तर देत सलमान खान आपले बोट कॅटरिना यांच्या दिशेने वळवतो. सलमान काय म्हणतो की मी चाहत्यांचां नाही तर हीचा प्रत्येक फोटो झूम करतो.

मित्रांनो एक काळ असा होता की जेव्हा सलमान खान आणि कॅटरीना कैफ यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगायच्या. सलमान खान आणि कॅटरीना कैफ या दोघांनी मिळून पार्टनर, युवराज आणि एक था टायगर यांसारख्या चित्रपटात एकत्र काम केले त्यांची ही जोडी प्रेक्षकांना देखील खूप आवडली. या दोघांनी ज्या चित्रपटात कामे केली त्या चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

सलमान पासून वेगळे झाल्यानंतर कॅटरिना कैफचे नाव रणबीर कपूर सोबत जोडण्यात आले. त्या दोघांचे खूप सारे फोटो सोशल मीडियावर वायरल देखील होऊ लागले. याचा त्यांच्या नात्यावर फारसा परिणाम झाला नाही.परंतु काही काळानंतर त्यांचे मार्ग पुन्हा वेगळे झाले.