फोटोमध्ये दिसणारी ही जाड मुलगी आहे आता बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री, असे बनवले नंतर स्वतःला इतकं फिट..जाणून आश्चर्य वाटेल

आजच्या युगात बुद्धिवान असण्याबरोबरच आपलं आकर्षक व्यक्तिमत्व असावं यासाठी लोक प्रयत्नशील असतात. योग्य पोषाख, सुदृढ शारीरिक ठेवण यासाठी जागरूकता वाढली आहे. सिनेक्षेत्रात अभिनेता-अभिनेत्री होण्यासाठी अभिनयासोबत लुक आणि फिटनेस यांवरही भर दिला जातो.

सिनेमातल्या नट्या नुसत्या आठवल्या तरी म्हणतात ना, ‘दिल गार्डन गार्डन हो गया’ अशी अवस्था होते. त्यांची सुंदरता आणि फिटनेसच (Fitness) इतका जबरदस्त असतो. त्यासाठी या अभिनेत्री खूप मेहनत घेतात. सोशल मीडियावर त्यांच्या व्यायामाचे आणि योग (Yoga) करतानाचे व्हिडिओ वायरल होत असतात. पण सिनेमात येण्याआधी या नट्या आधी इतक्याच नाजूक आणि सुंदर असतात का?

आपण इथल्या फोटोत पाहु शकतो की, एक गोंडस आणि गुटगुटीत मुलगी दिसत आहे. पण हिचे सध्याचे फोटो पाहिले तर आपण म्हणू अरे बाप रे! कारण ही मुलगी पुढे जाऊन अभिनेत्री बनली. आणि आपल्या मो’हक अदांनी, नृत्याने तिने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. या व्यक्तीचं नाव फोटो पाहून कळलं असावं, हिचं नाव आहे समीरा रेड्डी. (Sameera Reddy) समीरा रेड्डीने आपल्या सिने कारकीर्दीची चांगली सुरुवात केली. पण नंतर ती सिनेमात फारशी दिसली नाही. तिने या पासून फारकत घेऊन पुढं नंतर बहुतांश अभिनेत्रींचं जे होतं तेच तिचं झालं.

१९९७ पासून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली. तिला पहिल्यांदा एक गाण्यांचा अल्बम होता त्यात काम केलं, ज्याचं नाव ‘और अहिस्ता’ असं होतं. २००२ मध्ये तिला पहिला सिनेमा मिळाला, ज्यात तिचा हिरो होता, सोहेल खान. सिनेमाचं नाव होतं, ‘मैने दिल तुझको दिया’, इथून पुढे चांगले सिनेमे तिला मिळत गेले.

यामध्ये प्रामुख्याने मुसाफिर, नो एन्ट्री, डरना मना हैं, टॅक्सी नं. 9211 (Taxi no. 9211) और दे दना दन सारखे तगड्या बॅनरचे सिनेमे होते. यांत ती मुख्य भूमिकेत होती.

२०१४ मध्ये तिने अक्षय वर्दे या मराठी उद्योगपतीशी लग्न केलं. त्यानंतर चंदेरी दुनियेपासून लांब राहणंच पसंत केलं. समीरा आता दोन मुलांची आई आहे. त्यांच्या पालनपोषणामध्ये ती आता व्यस्त झाली आहे. ती आणि तिची सासू, तिची मुले यांचे मजेशीर व्हिडिओज् सोशल मीडियावर प्रसिद्ध करत असते. त्यांना चांगलीच पसंती मिळते. एकूणच समीरा संसारात रमली आहे, आणि तिचे व्हिडिओ पाहिल्यावर तिचा अविर्भाव दिसतो की ‘मी आणि माझा संसार बरा आहे.’

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.