हातात बांगड्या कपाळात सिंधुर अश्या पध्दतीने विक्की सोबत पहिल्यांदाच स्पॉट झाली अभिनेत्री कॅटरिना कैफ…

कधी कधी आपण खूप वेळ आपली नाती लपवण्याचा प्रयत्न करतो पण नाती लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाही आहे कधी ना कधी ती लोकांसमोर नक्कीच येते. अशीच गोष्ट सध्या बॉलिवूडमध्ये घडली असल्याचे तुम्ही पाहिले असेल विकी आणि कॅटरिना कैफ यांचे नुकताच लग्न झाले लग्नाअगोदर त्यांच्या खूप साऱ्या चर्चा होत असताना दिसत होत्या. लग्नाबाबत विकी आणि कॅटरीना यांनी ूप सार्‍या गोष्टी लपवल्या होत्या हे तुम्ही पाहिले असेल पण शेवटी कोणतीही गोष्ट लपत नसते कधी ना कधी ती लोकांच्या समोर येतच असते.

नुकताच अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांचा विवाह सोहळा संपन्न झाला लग्नानंतर ते आपल्या कामावर परतले तेव्हा खूप सारे लोकांनी त्यांचे अभिनंदन केलं. सोशल मीडियावर सध्या कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये विकी कौशल कॅटरीना कैफला मागणी घालत असतो.

View this post on Instagram

A post shared by @bollywood__gossip

अभिनेते विकी कौशल आणि कतरिना कैफ ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. सवाई माधोपूर येथील बारवारा किल्ल्यावर या जोडप्याने सात फेऱ्या मारल्या. लग्नानंतर लगेचच ते हनिमूनला गेले. आता दोघेही मुंबईला परतले आहेत. अलीकडेच विकी आणि कतरिना देखील स्पॉट झाले होते, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते. लग्नानंतर विकी आता कामावर परतला आहे, याची माहिती अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

फोटोमध्ये विकी एका आउटफिटमध्ये दिसत आहे. काळ्या टोपी आणि चष्मा घालून अभिनेत्याने आपला लूक पूर्ण केला आहे. कारमधून प्रवास करताना विकी खिडकीतून बाहेर पाहत आहे. अभिनेत्याच्या चेहऱ्यावर सूर्य पडत आहे. फोटो शेअर करताना, विकीने कॉफी कप आणि क्लॅपर बोर्डचा एक इमोजी बनवला आहे. या फोटोला चाहते खूप लाइक आणि कमेंट करत आहेत.

कतरिनाने आपल्या पहिल्या स्वयंपाकघरात पुडिंग बनवले होते, ज्याचा फोटोही समोर आला होता. विकीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘गोविंदा नाम मेरा’ आणि ‘साम बहादूर’ या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर कतरिना ‘फोन भूत’ आणि ‘टायगर ३’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे. त्यामुळे ते पुन्हा आता आपल्या कामावर परतले आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तर तुम्हाला कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद.