अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय एकमेकींन सारख्या हुबेहूब दिसण्यामागचे कारण, जाणून थक्क व्हाल..

मित्रहो जग तसे पाहिले तर खूप मोठे सुद्धा आहे आणि खूप लहान सुद्धा आहे. आपलीच माणसे फिरून फिरून आपल्याकडे वळतात. अनेकांचे चेहरे एकसारखे दिसतात, आणि यामध्ये जास्त प्रमाणात खरेपणा आहे. थोडासा फरक सोडला तर बाकी खुपजण एकसारखे दिसतात. बॉलिवूड मधील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सुद्धा याच कारणावरून नेहमी चर्चेत असते, ती ८० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय सारखी दिसते असे अनेकांचे म्हणणे आहे.

यामागचे कारण जाणून घेण्यासाठी सुद्धा अनेक लोक फार उत्सुक आहेत. सोनाक्षी रीना सारखी हुबेहूब दिसते, त्यामुळे अनेकजण तिला तिच्या पहिल्या चित्रपटात म्हणजेच फिल्म “दबंग” पाहून चकित झाले होते. तिचा त्यावेळी जो लुक होता तो अगदी हुबेहूब अभिनेत्री रीना रॉय सारखाच होता. रीना ही सोनाक्षीचे वडील आणि सुप्रसिद्ध अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रेयसी सुद्धा होती. म्हणूनच की काय सोनाक्षीचा चेहरा रीना सोबत मिळताजुळता असावा असे अनेकांना वाटते.

शत्रुघ्न आणि रीना यांनी जवळपास १६ चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्या दोघांची जोडी अनेकांना आवडत होती.खूपशा डायरेक्टना या जोडीसोबत काम करायला आवडत होते आणि म्हणूनच त्या काळात ही जोडी नंबर वन च्या पोजिशन वर होती. त्यांच्या प्रेमाची चर्चा त्यावेळी सर्वत्र सुरू होती, शत्रुघ्न विवाहित असूनही रीनाच्या प्रेमात वेडे होते, नंतर जेव्हा रिनाला जाणवलं की शत्रुघ्न तिच्या सोबत लग्न करणार नाही तेव्हा तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान सोबत लग्न केले. मात्र १९९० मध्ये त्यांचा काडीमोड झाला होता.

एका मुलाखतीत रिना म्हणाली होती की सोनाक्षी तिची आई पूनम सारखी दिसते आणि सोनाक्षीने सुद्धा आपण रीना सारखे दिसत असण्यावर नकार दिला होता. सोनाक्षी आणि रिना या दोघीही बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्या दोघीनीही या क्षेत्रात भरपूर ओळख मिळवली आहे. मात्र त्यांचे सौंदर्य आणि चेहरे अनेकांना फसवतात. जणू काही मायलेकी असल्यासारखे वाटते मात्र त्या दोघीही यावर नकार देतात. शत्रुघ्न सिन्हा आणि रीना हे दोघेही प्रेमात खूप वेडे होते, त्यांचे संबंध जवळजवळ 7 वर्षे होते.

त्यामुळे अनेकांना वाटते की सोनाक्षी ही रिनाची मुलगी असावी म्हणून तिचे दिसणे रिना सारखे आहे. पण या चर्चेत काहीही तथ्य नाही. त्या दोघेही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत. तरीही एक अभिनेत्री या नात्याने दोघीनीही प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.