CID नंतर आता शिवाजी साटम नव्या भूमिकेच्या शोधात! केला हा मोठा खुलासा….

मित्रहो छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रदर्शित होत असतात, या मालिकेत रसिक मंडळी पूर्णपणे हरपून जातात. जणू त्यांच्या रोजच्या जीवनातील या मालिका भाग बनून जातात. हिंदी क्षेत्रातील मालिका “CID” चांगलीच गाजलेली आहे, या मालिकेच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. शिवाय यातील खूपसे डॉयलॉग सुद्धा प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेले आहेत. यातील प्रत्येक कलाकार नेहमीच नव्याने। रसिकांच्या भेटीस आला आहे त्यामुळे ही मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खूपच आवडीने पाहतात.

या मालिकेतील “दया तोड दो दरवाजा” तसेच “कुछ तो गडबड है” यांसारखे डॉयलॉग प्रचंड लोकप्रिय झाले आहेत शिवाय हे डॉयलॉग बोलणारे अभिनेते शिवाजी साटम सुद्धा खूप प्रसिद्ध झाले आहेत.आजवर त्यांनी भरपूर चित्रपटात काम केले आहे मात्र त्यांना खरी ओळख आणि प्रसिद्धी “CID” मधूनच मिळाली आहे. अनेक गुन्ह्यांचे त्यांनी लोकांना दर्शन दिले असून, हे गुन्हे कसे घडतात किंवा समाज कसा वागत आहे किंवा अशा परिस्थितीत आपण समाजाशी कसे वागले पाहिजे यांसारखे धडे ते मालिकेच्या माध्यमातून आपणाला देत होते.

या मालिकेतून त्यांनी अनेकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. त्यांची ही ACP ची भूमिका प्रद्युम्रच्या रुपात अगदी घराघरात पोहचली आहे. त्यांचे बोलणे, वागणे, हवभाग, अभिनय रसिकांच्या प्रचंड पसंतीस उतरला आहे. त्यामुळे ही भूमिका अतुलनीय आणि अविस्मरणीय ठरली आहे. शिवाजी यांची आता पद्युम्र म्हणूनच सर्वत्र ओळख बनली आहे. मात्र ही मालिका बंद झाल्यापासून अनेक रसिक त्यांच्या भूमिकेची आठवण करत आहेत. शिवाजी यांना पुन्हा पडद्यावर पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

हिंदुस्थान टाइम्स ला मुलाखत देताना शिवाजी म्हणाले की “मला पुन्हा पडद्यावर वापसी करायची आहे. परंतु मला त्याच त्याच भूमिका नकोशा वाटत आहे. मला फार ऑफर्स येत आहेत, अस मी अजिबात म्हणत नाही. कारण माझ्याकडे सध्या काहीच ऑफर्स नाहीत. हे खरं आहे, मला हे सांगायला संकोच वाटत नाही. एक दोन ऑफर्स मिळाल्या होत्या. परंतु त्यासाठी मी तयार न्हवतो. मला काहीतरी नवीन हवं आहे. त्यांनी म्हणलं मला गेल्या अनेक वर्षात पोलिसांच्या अनेक ऑफर्स आल्या आहेत.

परंतु एक अभिनेता म्हणून मला त्याच त्याच भूमिका नको आहेत. त्यामुळे मी त्या नाकारल्या आहेत. मी मराठी रंगमंचावर काम केले आहे त्यामुळे मला ज्या भूमिका रुचतात मी त्याच भूमिका निवडत आलेलो आहे.” पुढे ते म्हणतात की “ACP” पद्युम्रची भूमिका पुन्हा मिळाले तर मी ती पुन्हा आनंदाने स्वीकारेन कारण ती भूमिका साकारून मी कंटाळलो नाही.”, शिवाजी यांनी आजवर आपले खूप मनोरंजन केले आहे, त्यांना पुढेही त्यांच्या मनासारखी भूमिका मिळावी ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.