विकी कौशलसोबत लग्नानंतर कतरिना कैफला पुढील १५ दिवस राहावे लागणार सलमान खानसोबत, जाणून घ्या कारण..

सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटींची चर्चा पाहायला मिळते, पण आजकाल विकी कौशल आणि कतरिना कैफचे नाव सर्वांच्याच जिभेवर आहे, याचे कारण दुसरे तिसरे काही नसून त्या दोघांचे नुकतेच झालेले लग्न आहे. ९ डिसेंबर रोजी राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्नाच्या सात फेऱ्या घेऊन दोघांनी एकमेकांना कायमचे आपले बनवले होते, तेव्हापासून त्यांच्या लग्नाच्या विधींचे फोटो व्हायरल होत आहेत.

त्याचवेळी, डिसेंबर महिना दोन्ही कलाकारांसाठी खूप शुभ ठरला आहे. कारण याच महिन्यात दोघांच्याही नव्या आयुष्याला सुरुवात झाली. बातमीनुसार, आता हे दोन्ही कलाकार लग्नानंतर आपापल्या कामावर परतले आहेत.

जर वृत्तांवर विश्वास ठेवला गेला तर, कतरिना कैफ देखील सलमान खानसोबत व्यस्त असणार आहे, जे त्यांच्या आगामी चित्रपट टायगर ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहेत. पिंकवालाच्या एका बातमीनुसार, पुढच्या महिन्यापासून कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत. अशा परिस्थितीत कतरिना कैफला इच्छा नसतानाही विकी कौशलला सोडून सलमान खानसोबत एकत्र काम करावे लागणार आहे. विकी कौशलही त्याच्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी परतणार आहे. या वरून असे दिसून येते कि लग्ननंतर हि हे जोडपे आपल्या कामाला जास्त महत्तव देताना दिसून येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार लग्नानंतर कतरिना कैफला सलग १५ दिवस शूटिंगला जावे लागेल कारण चित्रपट पूर्ण करण्यासाठी इतके दिवस देण्यात आले आहेत. टायगर ३ च्या शेवटच्या सीक्वेन्सचे शूटिंग यावेळी दिल्लीत होणार आहे, त्यामुळे चित्रपटाच्या सेटवरही उच्च सुरक्षा तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय चित्रपटाची कथा किंवा कोणतेही दृश्य माध्यमांसमोर उघड होऊ नये, याचीही काळजी घेतली जाईल. चित्रपट निर्मात्यांनुसार या चित्रपटाची कथा पूर्णपणे अॅक्शनपॅक असणार आहे. यापूर्वी टायगर ३ चे शूटिंग रशिया, ऑस्ट्रिया, तुर्की आणि मुंबईत झाले होते, तर यावेळी दिल्लीत चित्रीकरण होणार आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या या लग्नाची खूप गोपनीयता ठेवण्यात आली होती, ज्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती, जरी चाहत्यांना त्यांच्या लग्नाची तारीख आधीच कळली होती. लग्नाची गोपनीयता ठेवण्यासाठी या दोन्ही कलाकारांनी लग्नात पाहुण्यांना फोटो काढण्याची परवानगीही दिली नाही.