लग्नानंतर आता कॅटरिना राहणार चक्क १५ दिवस सलमान सोबत.! ही कोणती नविन प्रथा कारण ऐकून थक्क व्हाल…

मित्रहो बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ हल्ली सोशल मीडियावर खूप जास्त चर्चेत आली आहे, अनेक बाबतीत तिच्या बद्दल रसिक चर्चा करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी तिच्या राजस्थान मध्ये झालेल्या लग्नाबद्दल विशेष चर्चा रंगली होती. तिची आणि विक्की कौशलची जोडी प्रचंड लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाली आहे. ते दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत, लग्नानंतर आता विक्की लगेचच आपल्या कामावर हजर झाला असून नव्या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

मात्र अभिनेत्री कॅटरिना अजून आपल्या कामावर रुजू झाली नसल्याची माहिती येत होती, ती आपल्या नव्या घरी म्हणजेच विक्की च्या घरी शिफ्ट झाली असून तिथले काही फोटो सुद्धा तिने चाहत्यांना शेअर केले होते. त्यामुळे यासगळ्यावरून लक्षात येते की तिने अजून कामाला सुरुवात केली नाही. मात्र नुकताच सोशल मीडियावर आणखीन एक बातमी व्हायरल होत असून असे सांगण्यात येत आहे की, कॅटरिना सलमान सोबत १५ दिवस आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंग साठी लवकरच जाणार आहे.

त्यांचा हा नवा चित्रपट म्हणजे “टायगर ३” हा आहे, याआधी या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले होते जे चाहत्यांनी अगदी डोक्यावर घेतले होते. आता याच्या तिसऱ्या भागासाठी कॅटरिना कदाचित सलमान सोबत दिल्लीला जाऊ शकते. त्यामुळे आता ती आपल्या विक्कीला एकटा सोडून शूटिंग साठी दिल्लीला जाणार. या फिल्म साठी कॅटरिना आणि सलमान खूप मेहनत घेत आहेत, आपल्या फिटनेस कडे खूप जास्त लक्ष देत आहेत.

विक्की आणि कॅटरिना च्या लग्नात सलमान हजर राहणार होते. मात्र त्याच दिवशी त्यांचा एक प्रोग्रॅम होता, म्हणून त्यांना जावं लागलं. पण लग्नाच्या दोन दिवसानंतर ते मुंबई मध्ये आले होते, आणि अशीही बातमी पसरत आहे की त्यांनी अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशलला रेंज रोवर कार गिफ्ट केली होती. सलमान आणि कॅटरिना यांची खूप छान मैत्री आहे, ते दोघेही उत्तम कलाकार आहेत.

त्यांचा हा “टायगर ३” कधी प्रदर्शित होणार याची अनेकजण वाट पाहत आहेत. सर्व चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. सलमान आणि कॅटरिना यांना त्यांच्या या चित्रपटासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.