लग्नानंतर नव्या घरी राहायला गेले कतरिना आणि विकी! पहा या आलिशान घराचे फोटो…

९ डिसेंबर २०२१ रोजी अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचा बहुचर्चित लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. या लग्नाची बरीच चर्चा झालेली पाहायला मिळाली. मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत पार पडलेले या लग्नाचे इतर फोटो उपलब्ध नसले तरी विकी आणि कतरिनाने त्यांच्या लग्नाचे मोजके फोटो सोशल मीडिया वर शेअर केलेले पाहायला मिळाले. हे फोटो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत.

त्यानंतर त्यांच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटोही सोशल मीडिया वर व्हायरल झालेले पाहायला मिळाले आहेत. आता या दोघांच्या नव्या घराचे फोटो समोर आले आहेत. लग्नानंतर कॅट आणि विकी आपल्या नव्या घरी राहायला गेले आहेत. या दोघांनी जुहू मधील एका आलिशान बिल्डींग मध्ये आपले घर भाड्याने घेतले आहे. या घराचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य हे आहे, की घरातून थेट समुद्राचे दर्शन होते. ही बिल्डिंग जुहूच्या समुद्रकिनारी असल्याने समुद्राचं विहंगम दृश्य नेहमी नजरेसमोर राहतं.

शहराच्या गजबजाटापासून हा भाग काहीसा बाहेरच्या बाजूला असल्याने त्यामानाने बराच शांत आहे. या बिल्डींगचा प्रत्येक मजला हा जवळपास ५०५५.४२ स्क्वेअर फूट इतका मोठा आहे. बिल्डींगच्या छतावर एक प्रशस्त स्विमिंग पूल देखील आहे. कतरिनाच्या घराच्या सगळ्याच खोल्या खूप सुंदर आहेत. या सगळ्याच खोल्या खूप प्रशस्त आणि देखण्या आहेत.

कॅट आणि विकीच्या या नव्या घराचे अजून एक वैशिष्ट्य हे आहे, की याच बिल्डींगमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली देखील राहतात. त्याअर्थी आता कतरिना आणि अनुष्का या शेजारी-शेजारी आहेत. कॅट आणि विकीच्या लग्नानंतर अनुष्काने दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छांमध्ये ती लिहिते, ‘लग्नाच्या बंधनात अडकलेली ही जोडी लवकरच आपल्या नव्या घरी राहायला येईल आणि आता लवकरच बांधकामाच्या आवाजापासून आमची सुटका होणार आहे.’

अलीकडेच कॅट आणि विकी आपल्या नव्या घरी राहायला गेले आहेत. विकीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून आपल्या या नव्या घराचे काही फोटो शेअर केले होते. यातील एक फोटो हा त्यांच्या बाल्कनीतला आहे. या फोटोमध्ये कतरिनाचे मेंदी लागलेले हात पाहायला मिळत आहेत. या हातांमध्ये तिने गाजर हलव्याचा बाऊल धरला आहे. हा गाजर हलवा तिने स्वतः केल्याचे विकीने सांगितले. लवकरच आपल्याला या घराचे आणि या दोघांचे अजून फोटो पाहायला मिळतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.