एअरटेल ४ जी जाहिरातीमधील हि गर्ल आठवते का? आता दिसते अशी, प्रत्यक्ष आयुष्यात आहे खूपच सुंदर…

एअरटेल ४ जी ची जाहिरात तर सगळ्यांनाच आठवत असेल. २०१५ मध्ये पहिल्यांदा ही जाहिरात दाखवली गेली होती. त्यातील मुलगी देखील बरीच प्रसिद्ध झाली होती. त्यावर बरेच मीम्स देखील बनवण्यात आले होते. या जाहिरातीतील ती मुलगी कोण आहे, याबद्दल त्यावेळी लोकांमध्ये बरेच कुतूहल जागृत झाले होते. आज आपण त्याच मुलीबद्दल जाणून घेणार आहोत.

‘एअरटेल ४ जी गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झालेली ही मुलगी आहे साशा छेत्री. साशा आपल्याला एअरटेलच्या अनेक जाहिरातींमध्ये दिसते. साशा एक मॉडेल आहे. साशाला लहानपणापासूनच मॉडेलिंग क्षेत्रात यायचे होते. साशाचे वडील एक व्यावसायिक असून आई गृहिणी आहे. मात्र साशाला वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यामुळे ती मॉडेलिंग क्षेत्रात उतरली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sasha Chettri (@ricksharani)

याचबरोबर साशा संगीत क्षेत्रातही कार्यरत आहे. ती स्वतःची गाणी स्वतः तयार करते आणि गाते देखील. तिने स्वतःचे एक गाणे देखील रिलीज केले आहे. तिच्या गाण्यांचे व्हिडिओज आपण तिच्या सोशल मीडिया वर पाहू शकतो. आपल्या युट्यूब चॅनेल वर देखील ती हे व्हिडिओ टाकत असते. साशा सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असलेली पाहायला मिळते. तिने काही काळ कॉपीरायटींगचे कामही केले होते.

२०१५ मध्ये तिने ‘कट्टी बट्टी’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. एका तेलगू चित्रपटातही ती झळकली आहे. साशाच्या नात्याबद्दल देखील बरेच बोलले जाते. ती एका संगीत दिग्दर्शकाला डेट करत असल्याचे बोलले जाते. मात्र साशाने यातील कोणत्याच वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sasha Chettri (@ricksharani)

एअरटेलच्या या जाहिराती जेव्हा दाखवल्या जाऊ लागल्या तेव्हा साशाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या जाहिराती सतत टीव्ही वर दाखवल्या जात असल्याने ‘टीव्ही वरील सर्वांत त्रासदायक मुलगी’ असा शिक्का साशा वर बसला होता. मात्र ती या सगळ्याचा विचार न करता आपल्या वाटेवर चालत राहिली. एका सर्व्हे नुसार, एअरटेल ४ जी ची ही जाहिरात २०१५ मध्ये जवळपास ५४,४०६ वेळा बघण्यात आली होती. साशाला या जाहिरातींसाठी जवळपास ४७५ तास चित्रीकरण करावे लागले होते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sasha Chettri (@ricksharani)

२०१८ मध्ये साशाचे नाव एका एमएमएसशी जोडले गेले होते. तिचे काही खासगी फोटो आणि व्हिडिओ या एमएमएस मध्ये होते. हे प्रकरण बरंच व्हायरल झालं होतं.

मनोरंजनसृष्टीतील अशाच काही बातम्या आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना जरूर फॉलो करा.