लंडन मध्ये ६० कोटींचा बंगला तर १०० कोटी रुपयांचे खासगी जेट, जाणून घ्या अजयची एकूण संपत्ती..

अजय देवगण हे तीन खान आणि अक्षय कुमारसह बॉलिवूडच्या पाच सुपरस्टारपैकी एक आहे. गेल्या ३० वर्षांपासून अजय देवगणने बॉलिवूडमधून करोडो रुपये कमावले आहेत. तो केवळ बॉलिवूडमधील अभिनेता नाही तर तो एक यशस्वी निर्माता देखील आहे. अलीकडेच त्याने पत्नी काजोलसोबत हेलिकॉप्टर ईला नावाचा चित्रपट बनवला.

तो वर्षभरात किती कोटी रुपये कमवतो याची तुम्हाला कल्पना आहे का? त्याच्याकडे स्वतःचे खासगी जेट आहे. त्याच्याकडे जगातील सर्वात महागड्या कारपैकी एक आहे.

अजय देवगण एका वर्षात इतके पैसे कमवतो, मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगणकडे एकूण २६० कोटी आहे तर २०१८ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न ३२ कोटी रुपये आहे. अजय देवगणने दोन वर्षात १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणारे चित्रपट दिले आहेत. विशेषतः रेड, गोलमाल अगेन टोटल धमाल असे चित्रपट दिले आहेत.

तो एका चित्रपटासाठी २२ कोटी इतकी फीस घेतो. त्याचबरोबर तो एका जाहिरातीसाठी ५ कोटी रुपये घेतो. याशिवाय, त्याने शेवटचा ६ कोटी रुपयांचा आयकर भरला होता.

अजय देवगण अडीच कोटी रुपयांच्या कारमध्ये फिरतो अजय देवगण महागड्या गाड्यांचा शौकीन आहे. याशिवाय त्याच्याकडे रेंज रोव्हर आहे. ज्याची किंमत दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

केवळ मुंबईतच नाही तर लंडनमध्ये त्याचे ६० कोटींचे घर आहे, त्याच्याकडे लंडनमध्ये जगातील सर्वात महागडे निवासी शहर आहे. ज्याची किंमत ६० कोटी इतकी सांगितली जात आहे. त्याचबरोबर त्याची मुंबईत दोन घरे आहेत. जुहूमध्ये एक अपार्टमेंट आहे. दुसरे घर मालगारी रोडवर आहे. दोन्ही घरांची किंमत सुमारे २५ कोटी रुपये आहे.

अजय देवगणकडे स्वतःचे खासगी जेट देखील आहे ज्याची किंमत सुमारे १०० कोटी रुपये आहे. हॉकर ८०० असे या खासगी जेटचे नाव आहे. ज्यामध्ये तो आपल्या कुटुंबासह सुट्टीवर फिरण्यास जातो.

अजय देवगण फिल्म्स नावाचे त्याचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे, ज्याची किंमत १०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यांनी त्यांच्या निर्मिती बॅनरखाली हेलिकॉप्टर ईला हा चित्रपट बनवला आहे. येत्या काळात तो आणखी चित्रपट बनवणार आहे.