अजय देवगणची मुलगी न्यास होणार गोविंदाच्या घरची सून, पहा सोशल मीडियावर व्हायरल न्यूज.

मित्रहो या अभिनय क्षेत्रात गेली कित्येक वर्षे आपल्या कलेतून नाविन्यपूर्ण कामगिरी बजावणारे अजय देवगण अनेकांचे लक्ष ठरले आहेत. त्यांच्या सारखा उत्कृष्ट अभिनेता आज बॉलिवूडला मिळणे ही बाब भाग्याचीच आहे. अजय देवगण यांनी अनेक चित्रपटात काम केले असून, त्यांचा अतरंगी अभिनय आजही निरनिराळ्या भूमिकेतून पाहायला मिळतो आहे. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियते मध्ये नेहमीच वाढ होत राहते. सोशल मीडियावर सुद्धा अजय देवगण चर्चेत असतात, काही ना काही कारणाने रसिक त्यांची चर्चा रंगवतातच.

हल्ली अजय पुन्हा चर्चेत आले आहेत, मात्र यावेळी चर्चेत येण्याचे कारण हटके आहे. अजय यांनी बॉलिवूड अभिनेत्री काजोल सोबत लग्न केले आहे, त्यांची जोडी आजवर सर्वांची प्रचंड लाडकी राहिली आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की या दांपत्याला युग देवगण आणि न्यास देवगण अशी दोन अपत्ये आहेत. त्यापैकी त्यांची मुलगी न्यास देवगण ही आता सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. न्यास सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. तिचे खूपसे फोटो पाहायला मिळतात.

पण आता न्यास आपल्या काही फोटोमुळे विशेष चर्चेत आली आहे, ती या फोटोमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांचा सुपुत्र यशवर्धन अहुजा याच्या सोबत दिसली आहे. बॉलिवूड आणि सोशल मीडिया मध्ये देखील चर्चा सुरू आहे की देवगण परिवार आणि अहुजा परिवार लवकरच एकमेकांचे व्याही होणार आहेत. कारण न्यास आणि यशवर्धन एकमेकांना डेट करत आहेत, त्यांच्या व्हायरल होत असलेल्या फोटोतून हे स्पष्ट होत आहे. हे दोघेही रिलेशनशिप मध्ये आहेत.

न्यास देवगणला मुंबई मधील एका रेस्टॉरंट मधून एका मुलासोबत बाहेर येताना पाहण्यात आले आहे, न्यास सोबत असणारा हा मुलगा दुसरा कोणी नसून यशवर्धन आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र या दोन्ही परिवाराच्या चर्चा जोरात सुरु आहेत. अजय देवगण आणि गोविंदा अहुजा हे दोघेही नव्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तर मित्रहो न्यास आणि यशवर्धन यांची जोडी पाहून तुम्हाला काय वाटते ते आम्हाला नक्की सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील आम्हाला कमेन्ट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.