चाहत्याच्या ह्या आवडत्या मराठी मालिका लवकरच घेणार निरोप..जागी होणार या नवीन मालिकेची एन्ट्री..

गेल्यावर्षी लॉक डाउनमुळे सर्व चित्रपट इंडस्ट्री विस्कळीत झाली होती. मालिका, चित्रपटाचे चित्रीकरण बंद असल्याने नवीन भाग वाहण्याकडे नव्हते. त्यामुळे जुन्या मालिका आणि चित्रपटांचे पुन्हा प्रक्षेपण करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मराठी वाहिनीवरती अनेक नवनवीन मालिकांनी धडक दिली. आज अनेक मराठी मालिका रंजक वळणावरती येऊन उभा आहेत.

तर काही मालिका निरोप घेण्याच्या स्थिती मध्ये आहेत. माहितीनुसार ‘श्रीमंताघरची सून’ ही मराठी मालिका आता शेवटच्या टप्यात आली आहे. या मालिकेमधील अभिनेत्री रूपात नंदने स्वतः एका चाहत्याला उत्तर देताना या गोष्टीचा खु’लासा केला आहे.

पुढे अभिनेत्रीने बोलताना सांगितले आहे कि या मालिकेचा जागी ‘अजूनही बरसात आहे’ हि नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला  येणार आहे. या नवीन मालिकांमध्ये उमेश कामत आणि मुक्ता बर्वे हे कलाकार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

‘लग्न पाहावे करून’ २०१३ साली या चित्रपटामध्ये उमेश कामत आणि मुक्ता बर्वे सोबत केले होते. आता तब्बल ८ वर्षानंतर दोघे या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मुक्ताने आपल्या सहज आणि सोप्या अभिनयाने सर्व चाहत्याच्या मनामध्ये घर केले आहे. मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या सारख्या दमदार चित्रपटामध्ये मुक्ताने काम केले आहे, तर अभिनेता उमेश कामात यांनी टाईम प्लिज, लग्न पाहावे करून या चित्रपटामध्ये काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

‘अजूनही बरसात आहे’ हि नवीन मालिका १२ जुलै पासून सोनी मराठी वाहिनीवरती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमधून उमेश-मुक्त लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.