RRR मधील १५ मिनिटांच्या भूमिकेसाठी आलियाला मिळाली मोठी रक्कम, जाणून घ्या अजय देवगणची फी..

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक अभिनेत्री आता चांगल्याच आघाडीवर आहेत, एकापेक्षा एक त्यांचे अभिनय आणि सुंदरता आहे त्यामुळे त्यांच्यात सुद्धा स्पर्धा वाढलेली दिसून येते. आपण पाहिले तर बॉलिवूड मधील सर्वात जास्त रक्कम घेणाऱ्या अभिनेत्री मध्ये गणली जाणारी अभिनेत्री आलिया भट्ट सुद्धा नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट मुळे चर्चेत येत असते. हल्ली ती आपल्या १५ मिनिटांच्या रोलमुळे भलतीच चर्चेत आली आहे, दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत ती हळूहळू रुळली जात आहे.

राजामौली यांच्या “RRR” चित्रपटात अगदी पट्टीचे कलाकार आहेत, यामध्ये त्यांनी अजय देवगण, आलिया भट्ट या सुपरस्टारना यामध्ये घेतले आहे. हे दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत, बॉलिवूड मध्ये त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. आता दाक्षिणात्य सिनेमात त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते भलतेच उत्सुक आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अनेकजण आवर्जून वाट पहात आहेत. हा चित्रपट ७ जानेवारी रोजी रिलीज होणार होता पण कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.

या चित्रपटात आलिया आपल्याला फक्त १० ते १५ मिनिटे दिसणार आहे, मात्र या १५ मिनिटात तिचा जो अभिनय असेल तो नक्कीच अनेकांना हुब्याने थक्क करून सोडणारा असेल कारण तिने या अभिनयासाठी आकारलेली किंमत ऐकून तिच्या भूमिकेची उत्सुकता भरपूर वाढली आहे. तिने या चित्रपटात काम करण्यासाठी फार मोठी रक्कम घेतली आहे, ती रक्कम ऐकून कोण्हीही चकित होईल. तिच्याकडे खरच खूप उत्तम कला आहे आणि ती त्याचा अचूक उपयोग करत आहे.

आलिया ने या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम केले आहे, मात्र तिची भूमिका खूप कमी कालावधीत आहे. तरीही तिने या भूमिकेसाठी जवळपास ९ कोटी इतकी रक्कम घेतली आहे. ही रक्कम आपल्याला थक्क करून टाकते, तसेच सुपरस्टार अजय देवगण यांची भूमिका सुद्धा खूप ओढ लावत आहे. त्यांनी या चित्रपटाचे शूटिंग फक्त ७ दिवसात संपवले आहे, आणि यासाठी त्यांनी ३५ कोटी रुपये रक्कम घेतली आहे.

आता हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची अनेकजण खूप उत्सुकतेने वाट बघत आहेत, यातील सर्व कलाकार उत्कृष्ट असून यामध्ये ज्युनियर एन टी आर , आलिया भट्ट, अजय देवगण यांसारखे सुपरस्टार आपल्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे उत्सुकता भलतीच ताणली आहे, हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होईल. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.