अष्टपैलू रवींद्र जडेजा आहे इतक्या संपत्तीचा मालक, वडील होते सुरक्षा रक्षक तर आहे या राजकारण्यांचा जावई..

ज्यावेळी ८ फेब्रुवारी २००९ रोजी रवींद्र जडेजाने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, त्याचवेळी भारतीय संघाला त्यांचा अष्टपैलू खेळाडू सापडला होता. जडेजाची गणना जगातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते. त्याला आयपीएल २०२२ साठी चेन्नई सुपर किंग्ज संघात तब्बल १६ कोटींची किंमत देऊन घेण्यात आले आहे. ही किंमत धोनीपेक्षा ४ कोटी रुपयांनी जास्त असल्याचे बोलले जात आहे. जडेजाने आपल्या मेहनतीने भारतीय संघात स्थान मिळवले आणि टिकवले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravindrasinh jadeja (@ravindra.jadeja)

अशा या लोकप्रिय अष्टपैलू क्रिकेटर बद्दल जाणून घेण्यात लोकांना फारच उत्सुकता आहे. विशेषतः क्रिकेटर्सना मिळणाऱ्या मानधनाबद्दल जाणून घेण्यात लोकांना जास्त रस असतो. मीडिया रिपोर्टनुसार, रवींद्र जडेजा कडे एकूण १०० कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. त्याच्या कमाईचा मुख्य स्रोत हा केवळ क्रिकेट आणि जाहिराती असा आहे. यातून तो बरीच चांगली कमाई करतो.

त्याच्याकडे एक आलिशान घर आहे. हे घर गुजरात मधील जामनगर येथे आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, त्याचे हे ४ मजली घर जामनगर मधील लोकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. याशिवाय त्याचे एक फार्म हाऊस देखील आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वर तो नेहमी या फार्म हाऊसचे फोटो शेअर करताना दिसतो. जडेजाला महागड्या कार्सचा देखील शौक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. यामध्ये ऑडी क्यू-७, बीएमडब्ल्यू एक्स-१ आणि हायाबुसा बाईकचा समावेश आहे.

रवींद्र जडेजाचा जन्म ६ डिसेंबर १९८८ रोजी गुजरात मधील जामनगर येथे झाला. त्याचे बालपण खूप गरिबीत गेले. त्याचे वडील सुरक्षा रक्षक होते, तर आई नर्स होती. जडेजाच्या वडीलांची इच्छा होती, की रवींद्र जडेजाने सैन्यात जावे. मात्र त्याच्या आईला त्याला क्रिकेटर झालेले पाहायचे होते. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जडेजा अहोरात्र मेहनत करू लागला आणि अखेर त्याची भारतीय संघात निवड झाली. मात्र त्यावेळी त्याची आई या जगात नव्हती. २००५ मध्ये त्याच्या आईचा एका अपघातात मृत्यू झाला होता. आईच्या आकस्मिक जाण्याने जडेजाला इतके दुःख झाले होते, की त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच्या मोठ्या बहिणीने त्याची आणि कुटुंबाची काळजी घेतली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ravindrasinh jadeja (@ravindra.jadeja)

पुढे जडेजाने मेहनत करून आपले नाव मोठे केले. १७ एप्रिल २०१६ मध्ये त्याने रिवा सोलंकी सोबत लग्नगाठ बांधली. या दोघांना एक मुलगी आहे. तिचे नाव निध्याना आहे. रिवा सध्या राजकारणात सक्रिय असून २०१९ मध्ये तिने भाजप मध्ये प्रवेश केला होता. ती समाजसेवा देखील करते.