अल्लू अर्जुन आणि रश्मिका चा नविन चित्रपट पुष्पा सध्या चित्रपटगृहात घालतोय धुमाकूळ! जमावला इतक्या कोटींचा गल्ला…

बॉलीवूड प्रमाणे साउथ इंडस्ट्री मधील देखील खूप सारे नवीन नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येऊन पोहोचले आहेत सध्या ते चित्रपट चर्चेच्या घरात आहेत अशाच एका चित्रपटाबद्दल आम्ही बोलणार आहोत. हिंदी प्रेक्षक ज्याप्रमाणे बॉलीवूड चित्रपटांना प्रेक्षकीय मत नोंदवतो त्याचप्रमाणे तो प्रेक्षक साऊथ चित्रपटाना देखील आपले मत नोंदवतो. दक्षिणा चित्रपटात ॲक्शन आणि अभिनय याची दिमाग दारी पद्धत वापरली जाते जी प्रेक्षकांना खूपच आकर्षित करते.

सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री याचबरोबर नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांचा ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa : The Rise) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पुष्पा हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद नोंदवला पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर कोट्यवधींचा गल्ला जमवला.

१७ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटांनी पहिल्याच दिवशी सुमारे ५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. फक्त या चित्रपटाने तामिळनाडूमध्ये ४.६ कोटी रुपये कमावले. माहितीनुसार तेलंगणामध्ये पहिल्याच दिवशी या चित्रपटाने सुमारे ११ कोटींचा व्यवसाय केला. अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मीका यांच्या केमिस्ट्री ला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती नोंदवली. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की ‘पुष्पा: द राइज’ हा चित्रपट पहिला भाग आहे! याचा दुसरा भाग २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

पुष्पा या चित्रपटाचे कथानक रेड सँडलवुड स्मगलर्सच्या याच्या वर आधारित आहे. अल्लू अर्जुन हा दक्षिण चित्रपटांमधील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे त्यांनी या अगोदर डिजे, आर्या यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. आज तो दक्षिण चित्रपटांमधील एक सुप्रसिद्ध नावाजलेला अभिनेता आहे त्याने केलेल्या नवीन चित्रपटात तिची को आर्टिस्ट रश्मिका हीदेखील दिसायला खूपच सुंदर आणि सटल अभिनय करणारी अभिनेत्री आहे.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे चित्रपट रिलीज होण्याआधी याच्या ट्रेलर मुळेच सगळीकडे याचीच चर्चा सुरू होती. चित्रपटाचे संगीत देवी श्री यांनी रचले आहे याचबरोबर पुष्‍पा या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवकुमार यांनी केले आहे.