‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनची आई साकारली आहे ‘या’ अभिनेत्रीने! खऱ्या आयुष्यात आहे…

सध्या सगळीकडेच ‘पुष्पा’ चित्रपटाची धूम पाहायला मिळते आहे. या चित्रपटातील गाणी आणि संवाद सध्या सगळ्यांच्याच तोंडी आहेत. चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. लाल चंदनाच्या तस्करीवर हा चित्रपट आधारित आहे. मात्र चित्रपटाच्या मुख्य कथानकासोबतच काही उपकथानकं देखील चित्रपटात दाखवण्यात आली आहेत.

असेच एक उपकथानक आहे पुष्पा आणि त्याच्या आईचं. पुष्पा आणि त्याची आई एका झोपडीत रहात असतात. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. पुष्पाच्या आईचे गावातील एका प्रतिष्ठित विवाहित पुरुषाशी संबंध असतात. त्यातूनच पुष्पाचा जन्म होतो. मात्र पुष्पाला वडिलांचे नाव लावता येत नसते. आपले वडील कोण आहेत हे माहीत असूनही तो आपल्या वडिलांचे नाव वापरू शकत नाही. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर पुष्पाला गावात अनौरस म्हणून हिणवले जात असते. पुष्पाच्या आईला अनेक अपमानास्पद प्रसंगांना सामोरं जावं लागतं. पुष्पा आणि त्याच्या आईची ही कथा पडद्यावर पाहताना डोळ्यांत पाणी आणते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kalppa Latha Garllapati (@kalppa_latha_garllapati)

या चित्रपटातील सगळीच पात्रे छाप सोडून जातात. विशेषतः पुष्पा आणि पुष्पाच्या आसपासची माणसं. मग त्याची प्रेयसी असू दे, त्याचा मित्र केशव असू दे किंवा त्याची आई असू दे, प्रत्येक पात्र आपल्या असण्याने पुष्पाच्या पात्राला उठाव आणतं. यातील पुष्पाची आई विशेष लक्षात राहते. पुष्पाच्या आईची ही भूमिका साकारली आहे अभिनेत्री कल्पलता यांनी.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kalppa Latha Garllapati (@kalppa_latha_garllapati)

विशेष म्हणजे चित्रपटात अल्लू अर्जुनच्या आईची भूमिका साकारणारी कल्पलता खऱ्या आयुष्यात मात्र अल्लू अर्जुनपेक्षा केवळ तीन वर्षांनी मोठी आहे. कल्पलता सध्या ४२ वर्षांची आहे. कल्पलताला दोन मुली आहेत. या दोन्ही मुली नोकरी करतात. खरंतर कल्पलताचं लग्न अगदी कमी वयात म्हणजे केवळ १४ वर्षांची असतानाच झालं होतं. कल्पलताने आजपर्यंत ५० पेक्षा जास्त दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने अनेक मालिकांमधूनही भूमिका साकारल्या आहेत.

कल्पलता सोशल मीडिया वर बरीच सक्रीय आहे. ती नेहमी आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते. तिचे हे फोटो पाहिल्यांनंतर या अभिनेत्रीने पुष्पाची आई साकारली आहे, यावर विश्वासच बसत नाही. मुळातच कल्पलता आपल्या वयापेक्षा थोडी लहान दिसते. त्यात तिचे सोशल मीडिया वरचे ग्लॅमरस फोटो पाहून कोणीही या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही, की या अभिनेत्रीने चक्क अल्लू अर्जुनच्या आईची भूमिका साकारली आहे.