‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन पाहिली का? चाकांवर फिरणारा महाल…

‘पुष्पा’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि जिथे तिथे केवळ याच चित्रपटाची हवा होताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन प्रमुख भूमिकेत दिसत आहे. अल्लू अर्जुनचा या चित्रपटातील लूक खूपच लोकप्रिय झालेला पाहायला मिळत आहे. ऍक्शन स्टार अल्लू अर्जुनचे या चित्रपटातील संवाद देखील लोकप्रिय होताना दिसत आहेत. त्याचबरोबर या चित्रपटातील गाण्यांनीही सगळीकडे धुमाकूळ घातलेला दिसत आहे.

या चित्रपटाचा हिरो अल्लू अर्जुन याच्या सगळ्याच गोष्टींबद्दल चाहत्यांमध्ये कुतूहल दिसून येते. हीच बाब त्याच्या व्हॅनिटी व्हॅन बद्दलही सांगता येईल. अल्लू अर्जुनची व्हॅनिटी व्हॅन म्हणजे चाकांवर फिरणारा महाल आहे. त्याची व्हॅनिटी व्हॅन रेड्डी कस्टम कारवा तर्फे डिझाईन करण्यात आली आहे. अल्लू अर्जुन अनेकदा सोशल मीडिया वर त्याच्या या व्हॅनिटी व्हॅनचे फोटो शेअर करताना दिसतो.

अल्लू अर्जुनची ही व्हॅनिटी व्हॅन भारतातील अत्यंत महागड्या व्हॅनिटी व्हॅन्सपैकी एक आहे. या व्हॅनिटी व्हॅनची किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे. त्याच्या या व्हॅनचे नाव ‘फाल्कन’ (Falcon) आहे. ही व्हॅन आतून एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या रूमसारखी आहे. या व्हॅनच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे अल्लू अर्जुनच्या नावाची आद्याक्षरे AA लिहिली आहेत. व्हॅनचे इंटेरियर काळ्या, पांढऱ्या आणि चंदेरी रंगात बनवलेले आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये रिक्लायनर चेअर, लेदर सीट सोफा, मोठा आरसा आणि बऱ्याच मनोरंजनाच्या गोष्टी सामावल्या आहेत.अल्लू अर्जुन बहुतांश वेळा आपल्या या व्हॅनिटी व्हॅन मधूनच प्रवास करणं पसंत करतो. व्हॅनिटीच्या अंतर्गत सजावटीसह त्याच्या बाह्यभागाच्या रुपाकडेही विशेष लक्ष पुरवण्यात आले आहे. या व्हॅनला बाहेरून पूर्ण काळा रंग देण्यात आला आहे. अल्लू अर्जुनच्या या व्हॅनिटी व्हॅनचे डिझाईन खूपच उत्तम आहे. शूटिंगमधून वेळ मिळाल्यानंतर अल्लू अर्जुन आपल्या व्हॅनिटीमध्ये येऊन आराम करणे पसंत करतो.अल्लू अर्जुन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक प्रख्यात अभिनेता आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणून अल्लू अर्जुनला जगभरात ओळखले जाते. त्याने आजपर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. भारतासह जगभरात त्याचे चाहते पसरले आहेत. त्याचा ‘पुष्पा’ हा चित्रपट तब्बल सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना झालेला आनंद गगनात मावत नाहीये. अल्लू अर्जुनच्या या यशानंतर पुन्हा एकदा चाहत्यांना त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टींबद्दल कुतूहल जागृत झाले आहे.