“अमेयने स्वतःच्या वाढदिवसालाच दिलं खास गिफ्ट! एका मित्राने केली पैशाची आठवण…”

अनेक कलाकार मराठी चित्रपट सृष्टीत काम करत आहेत. स्वतःच्या कौशल्यावर ते सर्वांचे मन जिंकून घेतात. मराठी सृष्टीतील कलाकार यांच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा ही नेहमी सोशल मीडियावर होत असते. तसेच त्यांच्या चाहत्यांना सुद्धा या कलाकारांविषयी जाणून घ्यायचं असतं. त्यांच्याविषयी सर्व अपडेट्स हे त्यांचे चाहते ठेवत असतात. चाहत्यांना सुद्धा त्यांच्याविषयी जाणून घ्यायची खूप उत्सुकता लागून राहिलेली असते.

सोशल मीडियावर सध्या अभिनेता अमेय वाघ हा खूपच चर्चेत आहे. अमेय याचा नुकताच वाढदिवस झाला. १३ नोव्हेंबर ला त्याचा वाढदिवस झाला. या दिवशी त्याने स्वतःलाच एक विशेष गिफ्ट दिलं आहे. तर अमेय याने स्वतःलाच लक्झरी मर्सिडीज कार या ब्रँडची मर्सिडीज लिमुझिन ही कार गिफ्ट केली आहे. या मर्सिडीज कार सोबतचा त्याचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मर्सिडीज कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना त्याने सुंदर असं कॅप्शन ही दिलं आहे. “पुढचा प्रवास खडतर असेल… तर तो Mercedes ने करावा म्हणतो! Gifted my self a new car on this birthday! #mercedesaclasslimousine A big thank you to” असं त्याने कॅप्शन मध्ये लिहलं आहे. असं सुंदर असं कॅप्शन त्याने आपली पोस्ट करताना लिहलं आहे.

View this post on Instagram

A post shared by amey wagh (@ameyzone)

अमेयच्या या फोटोवर सर्वांनी लाईक करत त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. कमेंट द्वारे त्याची प्रशंसा करत आपले मत व्यक्त केलं. अमेय च्या एका मित्राने त्याचे अभिनंदन करत त्याची खिल्ली उडवली आहे. तर त्याचा तो मित्र म्हणजे निपुण, या मित्राने अभिनंदनही केलं. तर त्याने कमेंट मध्ये लिहलं आहे की, ‘बारावी मध्ये तुला २०० रुपये दिले होते..तेव्हा म्हणाला होतास काय हवं ते माग… आठवतंय काय? आज तो दिवस आलाय’

सुव्रत जोशी याने सुद्धा कमेंट केले आहे की, शेठ, आज खऱ्या अर्थाने मध्यमवर्ग सोडल्याच्या शुभेच्छा! आता ही घेऊन पार्किंग वाल्यांशी भांडू नकोस! अशाप्रकारे अमेयला त्याच्या सेलिब्रिटी मित्रांनी आणि चाहत्यांनी सुद्धा त्याच्या या पोस्टला वेगवेगळ्या कमेंट करत त्याचे अभिनंदन केले. Congratulations, Amazing, kamalll अशा अनेक कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या सुद्धा शुभेच्छा दिल्या.

View this post on Instagram

A post shared by amey wagh (@ameyzone)

अमेय वाघ याची Mercidiz तुम्हा सर्वांना कशी वाटली, हे कमेंट द्वारे नक्की सांगा. तसेच अमेय त्याच्या मित्राला म्हणजे निपुणला दिलेले वचन पूर्ण करेल काय याविषयी तुम्हा सर्वांना वाटणारे मत कमेंट मध्ये सांगा.
अमेय वाघ याची अशीच प्रगती होत राहो. त्याला असेच यश मिळू दे हीच सदिच्छा…अमेयला त्याच्या भावी जीवनासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला. या लेखाविषयी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक सुद्धा करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा.