बापरे…! पातेलं भरून तुपासह देवेंद्र फडणवीस खायचे ३० ते ३५ पुरणपोळ्या, अमृता फडणवीस यांनी केला खुलासा…

मित्रहो मराठी रंगमंचावर अनेक रियालिटी शो सुरू असतात, या शोज मधून अनेक कलाकार आपल्या भेटीस येत असतात. तसेच काहीवेळा त्यांच्या सोबत बोलता बोलता त्यांच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी रसिकांसमोर येतात आणि मग त्यावरून आणखीनच ते कलाकार चर्चेत येतात. मित्रहो हल्ली झी मराठी वाहिनीवर एक शो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे, हा शो अनेकदा प्रेक्षकांना आकर्षित करतो.हा शो म्हणजे “किचन कल्लाकार” आहे. या शोमधून आतापर्यंत खूपसे कलाकार रसिकांच्या भेटीस आले आहेत.

या शोमध्ये खुपजनांच्या खाजगी आयुष्यातील गमती जमती ऐकायला मिळतात. हल्ली सोशल मीडियावर हा शो खुपच चर्चेत आला आहे, तसेच या शोमधून आपल्या राज्याच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस देखील चर्चेत आल्या आहेत. मित्रहो काही दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यामध्ये जेवणाची थाळी अगदी भरगच्च भरलेली दिसत होती आणि त्या थाळीसमोर बसून जेवणाचा आस्वाद घेताना भाजप नेते दिसत होते.

या फोटोवर अनेकांनी निरनिराळ्या कमेंट केल्या होत्या, तसेच यामध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा होते. त्यावेळी सोशल मीडियावर त्यांच्यावरून देखील नेटकऱ्यांची चर्चा सुरू होती. खान्यावरून अनेकांनी खूप काही बोलले होते, पण मंडळी आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीनेच एक खास माहिती सर्वांशी शेअर केली आहे. अमृता फडणवीस या “किचन कल्लाकार” या शोमध्ये झळकल्या आहेत. यामध्ये सहभागी होऊन त्यांनी अनेकांचे मनोरंजन केले आहे. यावेळी देवेंद्र हे देखील व्हिडीओ कॉल द्वारे उपस्थित होते.

“किचन कल्लाकार” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करतो, त्याने अमृता फडणवीस यांना खूपच मजेशीर प्रश्न विचारला होता. विशेष म्हणजे या मजेशीर प्रश्नाचे उत्तर देखील अमृता यांनी मजेशीर पध्दतीनेच दिले आहे. उत्तर देतेवेळी अमृता यांनी सांगितले की “पातेलंभर तुपासोबत देवेंद्र फडणवीस हे ३० ते ३५ पुरणपोळ्या सहज खायचे.”, तसेच अमृता पुढे म्हणतात की “मी न बनवलेल्या पुरणपोळ्या खाताना त्यांना पाहण्याची माझी इच्छा आहे.” त्यांचे हे उत्तर ऐकून अनेक प्रेक्षक हसत आहेत.

अमृता फडणवीस ज्या एपिसोड मध्ये सहभागी होत्या तो एपिसोड अजून प्रसारित झालेला नाही. पण लवकरच हा प्रसारित होऊन प्रेक्षकांना खळखळून हसण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम दिवसेंदिवस खूपच छान होत आहे, यामध्ये अनेक कलाकार आपल्या भेटीस येतात. तसेच इथे आल्यावर निरनिराळे पदार्थ करतात. याचे सूत्रसंचालन अभिनेता संकर्षण कऱ्हाडे करत असून याचे परीक्षण प्रशांत दामले करत आहेत. तुम्ही देखील हा शो नक्की पहा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून सांगा तसेच आजचा हा लेख कसा वाटला ते देखील सांगा. जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.