फोटो मध्ये असणारी ही चिमुकली करतीये मराठी चित्रपटसृष्टीवर राज! आहे एक मोठं नाव? ओळख पाहू..

मित्रांनो आपल्या आयुष्यात खूप सारे वळण असतात पण खरे आपण आयुष्यात काय करणार असतो काय बनणार असतो? हे कोणालाच माहीत नसतं, कधी आपल्या सोबत कॉलेज वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये नाटक उभे करणारे छोटे मोठे कलाकार पुढे जाऊन मराठी सिनेमा तारका मध्ये अव्वल असतील हे कोणालाच माहीत नसतं. पण त्यांच्या लहानपणीच्या आठवणी ह्या आज सुद्धा तुम्हाला त्यांच्या फोटोमधून दिसत असतील.

तूर्तास आईचा दिवस म्हणजेच मदर्स डे झाला अश्या वेळेस त्या दिवशी आपल्या लाडक्या आईसोबतचे फोटोज व्हायरल होत होते, ह्या दिवशी अनेक सेलेब्रिटी लोकांनी फोटो शेयर करत आई वरच प्रेम दाखवल. अश्यात मराठी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री जिचा आपण लहानपणीचा फोटो पाहून तुम्हाला नक्की तुमच्या बालपणीची आठवण येईल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चिमुकली आणि आईचा जो फोटो आहे त्यातील चिमुकली दुसरी तिसरी कोणती नसून अभिनेत्री अमृता सुभाष आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

तुम्हला जाणून आश्चर्य वाटेल की अमृता सुभाष ही अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे, तिने अलिकडेच आपल्या आईसोबतचा फोटो शेयर केला आहे. हा फोटो पोस्ट करत असताना अमृताने ‘आई’ असा कॅपशन दिला ज्यावर चाहत्यांनी कॅमेन्टचा वर्षाव केला आहे, त्याचबरोबर ह्या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

अमृता सुभाष ही सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह राहत असते ह्यातून ती आपले फोटोज पोस्ट करत असते त्याचबरोबर तिच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल फोटो पोस्ट करून माहिती देत असते, तिचे चाहते तिच्यावर सतत प्रेमाचा वर्षाव करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Subhash (@amrutasubhash)

अमृताचे शिक्षण ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’, मध्ये झाले आहे, तिने हिंदी मराठी या दोन्ही भाषेच्या नाटकात काम केली आहेत, याचबरोबर तिने पु.ल.देशपांडे लिखित ‘ती फुलराणी’ हे नाटकात काम केलं आहे, २००४ साली तिने ‘श्वास’, ह्या चित्रपटातून प्रदार्पण केलं होतं, तिने शास्त्रीय गायन देखील पूर्ण केलं आहे, तिने २०१२ साली सा रे ग म प रियालिटी शो मध्ये देखील भाग घेतला होता. त्याचबरोबर अमृता सुभाष एक लेखिका सुद्धा आहे तीच ‘एक उलट एक सुलट’ पुस्तक प्रकाशित झाला आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.