अभिनेता अनिल कपूर करतायत या गंभीर आजाराचा सामना, उपचारांसाठी जर्मनीत दाखल…चाहत्यांकडून चिंता व्यक्त…

बॉलिवूड मधील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून अनिल कपूरला ओळखले जाते. इतक्या वर्षांनंतरही त्याच्या चेहऱ्यावर त्याचे वयच दिसत नाही. त्यामुळे तो आपल्या वयापेक्षा नेहमीच लहान दिसतो. तसेच तो नेहमीच आपल्या वयाच्या मानाने उत्साही दिसतो. त्याच्या या उत्साहाचे रहस्य जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. अशा वेळी त्याच्या आजारपणाची बातमी समोर आली तर…?

नुकताच अनिल कपूरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओमुळे त्याचे चाहते चिंताग्रस्त झालेले पाहायला मिळत आहेत. सध्या अनिल कपूर जर्मनी मध्ये आहे. या व्हिडिओ मध्ये तो जर्मनीमधील रस्त्यावर मजेत चालताना दिसत आहे. व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकतो, की हलकेच बर्फ पडत आहे. मात्र त्याने या व्हिडिओला जे कॅप्शन दिले आहे त्यावरून काहीतरी वेगळेच वाटत आहे.

व्हिडिओ मध्ये अनिल कपूरने काळा कोट, काळी कॅप, काळी पँट आणि काळे शूज घातले आहेत. बर्फवृष्टी होत असल्याने त्याने गळ्यात काळा मफलर आणि हातात काळे हँडग्लोज घातलेले दिसत आहेत. त्याने आपल्या या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे, “बर्फ पडत असताना हा एक परफेक्ट वॉक आहे! जर्मनी मधील शेवटचा दिवस. माझ्या उपचारांच्या शेवटच्या दिवशी मी डॉ. मुलर यांच्याकडे चाललो आहे. त्यांच्या जादूई उपचारांसाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे!”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अनिल कपूरच्या आजारपणाची ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना त्याची काळजी वाटू लागली आहे. अनिल कपूरने तो कोणत्या आजारावर उपचार घेतले आहेत याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. चाहत्यांनी त्याच्या या पोस्ट वर कमेंट करत त्याला या उपचारांचे कारण विचारले आहे. मात्र अजून त्यावरही अनिल कपूरने कोणतेही उत्तर दिलेले नाही. कमेंट्स मधून चाहत्यांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

गेलं दशकभर अनिल कपूर Achilles Tendinitis च्या त्रासाने ग्रस्त होता. अनेक जण तो याच्याच उपचारांसाठी परदेशी गेला असल्याचा निष्कर्ष काढत आहेत. पायाच्या टाचेच्या वरचे म्हणजेच पोटरीच्या खाली असलेले टेंडन्स दुखावले गेले, की Achilles Tendinitis हा त्रास सुरू होतो. अनिल कपूरच्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान त्याला दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्याला हा त्रास सुरू झाला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लवकरच त्याच्या परदेशात उपचार घेण्यामागचे कारण समजू शकेल अशी आशा करायला हरकत नाही.