अनिल कपूरच्या पोस्टवर त्यांचा मुलगा हर्षवर्धनने केली अशी कॉमेंट, ऐकून व्हाल चकित.

अनिल कपूर यांचा अभिनय व व्यक्तिमत्व अतिशय मनमोहक आहे. अनिल कपूर यांचे विविध चित्रपट आपण पहिले असतील ज्या मध्ये त्यांनी दर्जेदार अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली.

अनिल कपूर यांचा जन्म २४ डिसेंबर १९५६ साली मुंबईच्या चेंबूर येथे झाला.यांचे वडील सुरेंदर कपूर हे आधी शमी कपूर यांचे तर त्या नंतर गीता बाली यांचे मॅनेजर होते.मात्र काही काळा नंतर ते स्वतः चित्रपट निर्माते झाले.

अनिल कपूर यांनी ‘हमारे तुम्हारे ‘, ” शक्ती ” या सारख्य  चित्रपटांमध्ये सुरुवातीला लहान मोठ्या भूमिका साकारून बॉलीवूड मध्ये आपल्या करिअर सुरवात केली. मात्र त्या नंतर एक असा चित्रपट त्यांनी केला ज्यामधून जनतेला कळले की अनिल कपूर यांच्यात एक वेगळेच अभिनय कौशल्य आहे. त्या चित्रपटाचे नाव  ‘वो सात दिन ‘. असे होते.

मोठे दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘ मेरी जंग ‘ या चित्रपटद्वारे लोकांना हे समजले की अनिल कपूर हे भावनांत्मक, हास्य, ॲ’क्श’न या प्रकारचे सर्व भूमिका ते उत्तम प्रकरे निभावू शकतात.

त्यांचा प्रत्येक चित्रपट जनतेच्या मनाला भावू लागला. व यांना या चित्रपटासाठी पहिल्यांदा सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. यानंतर ते एक से बढकर एक असे चित्रपट जनतेसमोर आणू लागले.

अभिनया बरोबरच शारीरिक फि’ट’ने’स, तंदुरुस्ती साठी देखील लोक अनिल कपूर यांना आदर्श मानतात. अनिल कपूर यांच्याकडे पाहून आपला विश्वास बसणार नाही की त्यांचे वय ६४ वर्षे आहे, होय,६४ वर्ष वय आहे! ६४ वर्षे वय असूनही अनिल कपूर हे तिशीतले दिसतात यामागे त्यांची मेहनत देखील आहे.

अनिल कपूर यांनी बऱ्याच वर्षा आधीच लेट नाईट पा’र्टी’ज वगैरे करणे सोडले आहे. किंवा ते पार्टीला गेले असतांना देखील आपल्या वेळेवर घरी येऊन ते निश्चित वेळी झोप घेतात. दररोज व्यायाम करतात. त्यांचा आहार अगदी नियंत्रित स्वरूपाचा असतो.

व या संदर्भातच एक प्रसंग घडला, अनिल कपूर यांनी काल को’रो’ना ल’सी’चा दुसरा डो’स घेताना काढलेला फोटो इंस्टाग्रामवर टकला व त्यावर अनिल कपूर यांचे सुपुत्र हर्षवर्धन कपूर यांनी,  ‘आपल्याला आता कशी लस मिळाली? नियमां नुसार तर आपल्याला १ मे नंतर लस मिळायला हवी होती ! ‘ अशी विनोदी कॉमेंट केली.

या कॉमेंट वर प्रतिक्रिया देत अनिल कपूर म्हणाले की, होय जर त्यांनी माझ्या आधार कार्ड वर माझी जन्म तारीख पहिली नसती तर नक्कीच मला १ तारखे नंतर यायला सांगितले असते!

हर्षवर्धन कपूर सोबतच इतर मोठमोठ्या बॉलीवुड हस्तीनी देखील त्या पोस्टवर कमेंट केलेल्या आहेत. त्याठिकाणी राकेश रोशन असे म्हणाले ‘ 🙌precaution is the best medicine ‘  अर्थातच ‘खबरदारी हेच उत्तम औषध’ असा उत्तम संदेश त्यानी जनतेला या कॉमेंट च्या माध्यमातून दिला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.