अंकिता लोखंडेकडे आहे इतकी संपत्ती! नुकतेच झाले प्रसिद्ध उद्योगपतीशी लग्न…

अभिनेत्री अंकिता लोखंडेने नुकताच आपला ३७ वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. यंदाचा तिचा वाढदिवस खूपच खास होता. कारण काही दिवसांपूर्वीच तिचे लग्न झाले आहे. त्यामुळे लग्नानंतरचा तिचा हा पहिलाच वाढदिवस होता. अंकिताने प्रसिद्ध उद्योगपती विकी जैन सोबत लग्नगाठ बांधली. विकी आणि अंकिता गेली काही वर्षं रिलेशनशिप मध्ये होते. आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत अंकिताने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून नावारूपाला आलेली अंकिता या मालिकेमुळे घराघरांत पोचली. त्यानंतर तिने चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली. ‘मणिकर्णिका’ आणि ‘बागी ३’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करत तिने मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. अलीकडेच ती तिच्या ‘पवित्र रिश्ता २’ मालिकेमुळे चर्चेत आली होती. अंकिता आपल्या कामासाठी जबरदस्त मानधन घेते. तसेच तिचा लग्नसोहळाही फार दिमाखात पार पडल्याचे लक्षात येते. तिच्या लग्नाला अनेक सेलिब्रेटी मंडळी उपस्थित होती. यावरून आता तिच्या संपत्तीची चर्चा सुरू झाली आहे.

बॉलिवूडची ही सुप्रसिद्ध अभिनेत्री करोडो रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे. एका रिपोर्टनुसार, अंकिता लोखंडेंकडे जवळपास २२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. आपल्या कामासाठी अंकिता कोट्यवधी रुपयांचं मानधन घेत असल्याचं कळतं. ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिच्या अर्चूच्या भूमिकेसाठी ती दीड लाख रुपये मानधन घेत होती. तिच्या पहिल्या चित्रपटासाठी म्हणजेच ‘मणिकर्णिका’ साठी तिने २ ते ३ कोटी मानधन आकारल्याचे कळते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

याशिवाय अंकिता आपल्या कुटुंबाबरोबर मुंबईमध्ये एका आलिशान अपार्टमेंट मध्ये रहात होती. विकी जैन बरोबर लग्न झाल्यानंतर ती त्याच्या ८ BHK अपार्टमेंट मध्ये राहायला गेली आहे. अंकिताला महागड्या कारची खूप आवड आहे. एका रिपोर्टनुसार, तिच्याकडे जॅग्वार एक्सजे आणि पोर्श ७१८ सारख्या आलिशान गाड्या आहेत. या दोन्ही कार कोट्यवधींच्या घरातल्या आहेत.

नुकतीच तिने तिचा बॉयफ्रेंड विकी जैन बरोबर लग्नगाठ बांधली. हा लग्नसोहळा फार दिमाखात पार पडलेला पाहायला मिळाला. या लग्नसोहळ्याला अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडिया वर बरेच व्हायरल झाले होते. तिच्या संगीत समारंभाला अभिनेत्री कंगना राणावतने देखील हजेरी लावली होती. एका वृत्तानुसार, अंकिताचा पती विकी जैनने अंकिताला मालदीवमध्ये एक व्हिला गिफ्ट केला आहे. या व्हिलाची किंमत जवळपास ५० कोटी असल्याचे बोलले जाते.