अंकिता लोखंडेचा पती आहे इतका श्रीमंत! गडगंज संपत्तीचा मालक आहे विकी…

सध्या अनेक सेलिब्रेटी बोहल्यावर चढताना दिसत आहेत. त्यातच आता ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेचीही भर पडली आहे. नुकतेच १४ डिसेंबर २०२१ रोजी अंकिता लोखंडेने तिचा बॉयफ्रेंड विकी जैन बरोबर लग्न केलं. या राजेशाही लग्नाची चर्चा सगळीकडेच होत आहे. तसेच हे लग्न खूपच थाटामाटात पार पडल्याने अंकिताच्या नवऱ्याविषयी म्हणजेच विकी जैन विषयी लोकांच्या मनात कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

विकी जैन याच्या एकूण संपत्तीचा आकडा माहीत नसला तरी त्याच्याकडे गडगंज संपत्ती असल्याचे दिसून येते. विकीचा जन्म छत्तीसगड मधील रायपूर येथे झाला आहे. विकीने आपले पदवीचे शिक्षण पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले आहे. त्याने अर्थशास्त्र विषयात पदवी संपादन केली आहे. पुढे त्याने जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (JBIMS) येथून एमबीए केलं आहे.

विकीचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यावसायिक आहेत. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिट्यूमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे. रिअल इस्टेट मध्येही त्यांचा व्यवसाय आहे. महावीर बिल्डर्स अँड प्रमोटर्स असं त्यांच्या रिअल इस्टेट कंपनीचं नाव आहे. या शिवाय विलासपूर मध्ये जैन कुटुंबीयांचं फर्निचरचं शोरूम देखील असल्याचे वृत्त आहे. विकीच्या कुटुंबाचा व्यवसाय शिक्षण क्षेत्रातही वाढलेला आहे. विकीचे वडील विनोद जैन हे विलासपूर मधील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांची गुंतवणूक प्री-स्कूल मध्येही असल्याचे वृत्त आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Jain (@jainvick)

एमबीए पूर्ण केल्यावर विकीनेही आपल्या घरच्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्तानुसार, विकी विलासपूर मधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा व्यवस्थापकीय संचालक आहे. या ग्रुपचा कोळसा व्यापार, वॉशरी, लॉजिस्टिक, पॉवर प्लॅन्ट, रिअल इस्टेट, डायमंड अशा गोष्टींमध्ये व्यवसाय आहे. विकी क्रीडाप्रेमी असल्याने त्याने क्रीडा क्षेत्रातही गुंतवणूक केली आहे. तो मुंबई टायगर्स या बॉक्स क्रिकेट लीग (BCL) चा सहमालक आहे. मनोरंजन क्षेत्राशीही त्याचे संबंध आहेत.

अंकिताचं मुंबईमध्ये ३ बीएचकेचं घर आहे. नुकतीच तिने विकिसोबत मिळून ८ बीएचकेच्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. लवकरच दोघे या नवीन घरात राहायला जाणार आहेत. दोघांनाही गाड्यांची आवड आहे. विकीकडे लँड क्रूझर आणि मर्सिडीज बेन्झ या कार आहेत, तर अंकिताकडे जॅग्वार एक्सएफ आणि पोर्श ७१८ या कार आहेत.